AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा लढा आपल्यालाच लढावा लागेल कारण…, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं

जर मोदींनी सांगितलं की, राहुल गांधी माझ्या मागे उभे राहा, नाहीतर तुम्हाला जेल मध्ये टाकेल, तर राहुल गांधी त्यांच्या मागे उभे राहतील.

हा लढा आपल्यालाच लढावा लागेल कारण..., वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं
प्रकाश आंबेडकर
| Updated on: Dec 17, 2022 | 6:53 PM
Share

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी, नाशिक : नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धम्म मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता एक नवीन कायदा यायच्या बेतात आहे, तो म्हणजे मॉरल पॉलिसिंग. म्हणजे तुम्ही खाणार काय, जगणार काय याचे अधिकार सरकारकडे जातील. घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य राहणार नाही. एखादं श्रद्धा सारखं प्रकरण बाहेर दिसतं. विकृती समाजात आहे. पण याला धरून शासन मॉरल कायदा गठित करू पाहत आहे. असा प्रचार सुरू आहे की, या देशात जे पंतप्रधान आहे, त्यांच्या तोडीचं कुणीच नाही. आपण दुर्दैवाने त्याला बळी पडतो, अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, या देशात आपल्याला खासदार निवडण्याचा अधिकार आहे. ते खासदार पंतप्रधान निवडतात. अजून या देशात उतरंडीची व्यवस्था आहे. तोपर्यंत न्हावी, कोळी, पारधी समाजाला मते मिळणार नाहीत.

2024 हा शेवटचा कालखंड आहे. जर मोदींनी सांगितलं की, राहुल गांधी माझ्या मागे उभे राहा, नाहीतर तुम्हाला जेल मध्ये टाकेल, तर राहुल गांधी त्यांच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे. माझ्या मागे उभे राहा. नाहीतर जेलमध्ये जालं. इथले लढे राजकीय लोकं लढतील, असं समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल, असंही त्यांनी मेळाव्यात संबोधित करताना म्हंटलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांची सत्ता तुम्ही 2024 ला बदला. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी असतील. 2024 ला मोदी विरोधात जातील, यासाठी आताच कामाला लागा. आम्ही मोहन भागवत यांना विचारतो की, तुम्हाला शस्त्र बाळगायचा परवाना आहे का, दाखवा. यांना शस्त्र बाळगायचा अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

2024 मध्ये एकतर आपण तरी हारू, नाहीतर ते तरी हारतील. काळाराम मंदिर सत्याग्रहातून बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखवून दिलं की, या देशातील शूद्र, अतिशुद्रांना मंदिरात जाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, यांना विशेष अधिकार दिल्याशिवाय यांचा सहभाग होऊ शकत नाही.

आंदोलन हे डोक्याने केलं पाहिजे. 56 इंचाची छाती चीनमध्ये 14 इंचाची होते. त्या सभागृहात आणखी काही माणसं शिल्लक आहे, ते मोदींना आव्हान देत आहेत. मोदी चीन विरुद्धच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही. मोदी आणि चीनचं काय प्रेम आहे, माहीत नाही?, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दुर्दैवाने इथले वर्तमानपत्र आणि त्यांचे मालक हे सुद्धा राजकीय नेत्यांसारखे झाले आहेत. आम्ही 20 देशांचे नेते झाले याबद्दल मोदींचे अभिनंदन करतो. पण अध्यक्ष केले म्हणून भारतातील बाजारपेठ विकू नका, हीच अपेक्षा आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.