कुटुंबाला मारहाण म्हणून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील दहीगाव संत येथे आपल्या कुटुंबाला मारहाण (beating of family) केली म्हणून तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या (Young man suicide) केल्याची घटना घडली. सागर गणेश खडसे (वय 22 रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

कुटुंबाला मारहाण म्हणून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील दहीगाव संत येथे आपल्या कुटुंबाला मारहाण (beating of family) केली म्हणून तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या (Young man suicide) केल्याची घटना घडली. सागर गणेश खडसे (वय 22 रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Young man commits suicide under train due to beating of family)

सागर यांच्या पाठीमागे आई कल्पना, वडील गणेश, भाऊ समाधान असा परिवार आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सागर यांच्या घरासमोर येऊन संदीप कोळी याने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. तेव्हा सागर यांची आई कल्पना यांनी येथे दारून पिऊन येऊ नको, असे संदीपला बजावले. यावेळी सागर व समाधान हे दोघेही उपस्थित होते. या प्रकारामुळे संदीपची बहीण राधा कोळी, मथुरा शेजवळ, नामदेव शेजवळ, यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी कल्पना यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीची माहिती समजताच सागर यांचे वडील गणेश खडसे घरी आले. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला मार लागला. यामुळे कल्पना यांनी पती, दोन्ही मुलांना घेऊन पोलिस ठाणे गाठले. मात्र, तिथे त्यांची तक्रार घ्यायला टाळाटाळ करण्यात आली. मारहाण आणि त्यानंतर तक्रार घ्यायला केलेल्या टाळाटाळीमुळे उद्विग्न होऊन सागरने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

मृतदेह घ्यायला नकार

दरम्यान, जोपर्यंत संबंधितांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत नाही. अंत्यसंस्कार करत नाही, अशी भूमिका खडसे कुटुंबाने घेतली होती. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पतीचीही आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या मुसळी येथे एका 42 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाब पंढरीनाथ भालेराव असे मृताचे नाव आहे. पत्नीला स्वयंपाक करून ठेव असे सांगून, गुलाब बाहेर पडले होते. मात्र, ते रात्री घरीच आले नाहीत. घरातल्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. (Young man commits suicide under train due to beating of family)

इतर बातम्याः 

NashikGold:सोने 150 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी महाग

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI