अभिनेत्री क्रांती रेडकरचे बौद्ध धर्माबद्दल मोठं विधान, म्हणाली “माझे आणि बौद्ध धर्माचे…”
नाशिकमध्ये झालेल्या राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आयएस अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थिती होती. जगाला युद्ध नको, बुद्ध हवे, असा संदेश पसरविण्यावर भर देण्यात आला. यावेळी विविध ठराव मांडण्यात आले

नाशिकमध्ये आज राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आयएस अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर देखील उपस्थित होते. या बौद्ध धम्म परिषदेला 10 देशातील 250 धर्मगुरू आणि भंते उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. तसेच रामदास आठवले, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी बौद्ध धर्माबद्दल विधान केले.
जगाला युद्ध नको बुद्ध हवे हे जगभरात पसरवले जाईल. बुद्धगया येथील विहार बुद्धांच्या ताब्यात द्यावे. राज्यातील प्रत्यक जिल्ह्यात बुद्ध अभ्यास केंद्र उभारण्यात याव्या. राज्यातील सर्व बुद्ध विहार आणि लेण्यांचे स्वरक्षण जतन करण्यात यावे, त्यातील विकृती करण रोखण्यात यावे. निधी द्यावा. बौद्ध धम्म स्थळांचा प्रचार करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा. प्रकाश लोंढे यांना महामंडळ मंत्री पद देण्यात यावे, असे अनेक ठराव यावेळी मांडण्यात आले.
राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेनिमित्त अभिनेत्री क्रांती रेडकरने जाहीरपणे भाषण केले. त्यावेळी तिने बौद्ध धर्माबद्दल तिचे मत काय? याबद्दल तिने विधान केले. धम्माचा प्रसार झाला पाहिजे मी इथे आज उपस्थित आहे. एकच वाघ आणि ते नाव रामदास आठवले हा माणूस एवढा मोठा का आहे ते आम्हाला आमच्यावर जेव्हा आभाळ कोसळले कळाले. तेव्हा ते पाठीशी उभे राहिले. समीर यांना फोन करून त्यांनी सांगितले बाळ तू लढ, असे क्रांती रेडकर म्हणाली.
मी त्यावेळी एका वेगळ्या अवतारात होते. त्यांच्या घरी मी पत्रकार परिषद घेण्यासाठी गेले आणि त्यांनी विचारपूस केली. रामदास आठवले यांची जोडी माझ्या आणि समीरच्या पाठीशी होती. तेव्हा ते उभे राहिले. माझे आणि बुद्ध धर्माचे मागच्या जन्माचे नाते आहे. सर्वांचे मनापासून आभार मानते. माणसाला माणूस समजणार देव होऊन गेला. ते आपल्या माणूस जगण्यासाठी अधिकार देऊन गेले. कायद्याचा वापर करा कोणा समोर झुकू नका. समीर वानखेडे यांच्याकडून मी आज खूप शिकते. मला त्यांच्या गालावरची खळी अजूनही मोहित करते, असे क्रांती रेडकर म्हणाली.
आमचे मंत्री आठवले यांचे खूप खूप आभार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्म परिषदेचे स्वप्न पूर्ण केले. पीपल एज्युकेशन सोसायटी माध्यमातून त्यांना ias ips आणि irs घडवायचे आहे. मी त्यांच्या पाठीशी आहे. आपल्या समाजातून अधिक घडवायचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पंचशील सांगितले त्याचे पालन केले पाहिजे. ncb झोनल ऑफिसर असताना धम्माचे पंचशील पालन केले. मी कधीही ड्रग्सचे सेवन आणि प्रसार करणार नाही. धम्माचे पालन करणार, असे समीर वानखेडे यांनी सांगितले.
