AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या जावयाला मुंबई गिळायचीय, पण आम्ही…; संजय राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut on BJP Gautam Adani Group BJP : संजय राऊत यांचा भाजपवर थेट निशाणा... गौतम अदानी भाजपचे जावई आहेत. या भाजपच्या जावयाला मुंबई गिळायचीय, पण आम्ही...; संजय राऊतांचा थेट इशारा. उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया... खासदारांच्या निलंबनावर राऊत काय म्हणाले?

भाजपच्या जावयाला मुंबई गिळायचीय, पण आम्ही...; संजय राऊतांचा थेट इशारा
| Updated on: Dec 15, 2023 | 10:31 AM
Share

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. गौतम अदानी हे भाजपचे उद्योगपती जावई आहेत. भाजपच्या जावयाला मुंबई गिळायची आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असं राऊत म्हणालेत. 16 डिसेंबर म्हणजे उद्या धारावी बचाव मोर्चा काढणार आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. धारावीसाठी मोर्चा होणारच आहे. तो मोर्चा फक्त धारावीसाठी नाही तर मुंबईकरांसाठी आहे. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचं हे सुरू आहे. देशाचे उद्योगपती जावयांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी बचाव मोर्चा होणारच आहे. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असं संजय राऊत म्हणालेत.

जागावर वाटपावर काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्रात आमचं जागावाटप झालं आहे. राज्यात आमचं उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणं शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही राज्यात 40 प्लस जागा जिंकू. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा आहे, असं म्हणत इंडिया आघाडी आणि आगामी लोकसभेच्या जागा वाटपावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशाकरता दिल्लीत येत आहेत माहीत नाही.दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. सरकार अस्थिर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहेत. कोर्टाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ हे सरकार… इथ येऊन काय करणार ते? त्यांना दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसतोय. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग? सगळा खेळ खंडोबा सुरू आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

खासदारांच्या निलंबनावर राऊत म्हणाले…

खासदारांच्या निलंबनावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. जी घटना घडली ती वाईट आहे. ज्या खासदाराने पत्र दिलं. त्याची साधी चौकशी सुद्धा नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना तुम्ही निलंबित करता. पण ज्याच्यामुळं हे घडल त्याला साधं नोटीस नाही? कारवाई नाही याला काय म्हणायचं? आम्ही आज 10 वाजता विरोधी पक्षांचे नेते बसणार आहोत आणि रणनीती ठरवणार आहोत, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.