AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेसोबत भयंकर प्रकार, मग पोलिसांनीही ना छापा, ना पाठलाग केला, थेट डिलिव्हरी बॉयचाच अवतार घेतला, पुढे…

नवी मुंबईतून एक थरारक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी केलेली कारवाईही चर्चेत आलीये. पोलिसांन नेमकं काय केलं आणि नेमकी घटना काय घडलेली?

महिलेसोबत भयंकर प्रकार, मग पोलिसांनीही ना छापा, ना पाठलाग केला, थेट डिलिव्हरी बॉयचाच अवतार घेतला, पुढे...
Mumbai Crime NewsImage Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2026 | 6:16 PM
Share

लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या महिलेला मॅट्रिमोनियल साइटवरून संपर्क साधत तब्बल ६ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. नागेश अर्जुन पवार असं मुख्य आरोपीचं नाव असून, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मीरा-भाईंदरमधील एका लॉजचा शोध घेतला. मात्र, आरोपीला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क डिलिव्हरी बॉयचा वेश धारण केला आणि त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली असून, दोघांची चौकशी सुरू आहे.

वेगवेगळी कारणं देत महिलेकडून पैसे उकळले

पीडित महिलेने जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर लग्नासाठी इच्छुक असल्याची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या माध्यमातून नागेश पवारने तिच्याशी संपर्क साधला. ओळख वाढवत विश्वास संपादन केल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्याने गाडीमध्ये बिघाड झाल्याचं कारण सांगत तातडीने पैशांची गरज असल्याचं महिलेला सांगितलं. सुरुवातीला ६५ हजार रुपये घेतल्यानंतर वेगवेगळी कारणं देत त्याने महिलेकडून पैसे उकळले.

खात्यामधील पैशांचाही गैरवापर केला

त्याचबरोबर बँकेचे खातेविवरण, ओटीपी आणि अन्य महत्त्वाची माहिती मिळवून तिच्या खात्यातील रकमेचाही गैरवापर केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद आहे.

पैसे परत मिळत नसल्याने आणि लग्नाबाबत आरोपीकडून टाळाटाळ होत असल्याने महिलेला समजलं की, आता आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी मीरा रोड-भाईंदर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक तेथे रवाना झालं. आरोपी लॉजमध्ये लपल्याचं समजल्यानंतर डिलिव्हरी बॉयचा वेश धारण करून पोलिसांनी त्याला अटक केली. यासंबंधीची सर्व माहिती शशिकांत चांदेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना दिली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे