AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नवी मुंबईत शिवसेना नेत्याचे भररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, गर्दी जमवून आतषबाजी

सुरेश कुळकर्णी हे नवी मुंबईतील माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. (Navi Mumbai Shivsena Birthday Celebration)

VIDEO | नवी मुंबईत शिवसेना नेत्याचे भररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, गर्दी जमवून आतषबाजी
शिवसेना नेते सुरेश कुलकर्णी यांचे ररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन
| Updated on: May 26, 2021 | 12:06 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील मुख्य वर्दळीच्या भागातच गर्दी जमवून शिवसेना नेत्याने वाढदिवसाचा जल्लोष केल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक सुरेश कुळकर्णी (Suresh Kulkarni ) यांनी गजबजलेला रस्ता अडवून फटाक्यांची आतषबाजी केली. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत तुर्भे परिसरात केलेल्या या जल्लोषामुळे टीकेची झोड उठली आहे. (Navi Mumbai Shivsena Leader Suresh Kulkarni Birthday Celebration amid Corona Lockdown sparks criticism)

तुर्भे स्टोअर येथील ठाणे बेलापूर रस्ता अडवून शिवसेना नेते सुरेश कुळकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली. फटाके फोडून आतषबाजी केल्याचे फोटो-व्हिडीओही समोर आले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील शेकडो नागरिक आणि पोलिस देखील उपस्थित होते.

कोण आहेत सुरेश कुळकर्णी?

सुरेश कुळकर्णी हे नवी मुंबईतील माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. कुलकर्णी यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सुरेश कुळकर्णी हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. नुकताच त्यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपवासी नेते गणेश नाईक यांचे ते खंदे समर्थक मानले जात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले होते. कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी लागल्यानंतरच त्यांची राजकीय दिशा ओळखली जात होती.

(Navi Mumbai Shivsena Birthday Celebration)

सुरेश कुळकर्णींवर कारवाई होणार का?

कोरोना काळात रात्रीच्या वेळी भररस्त्यात वाढदिवस साजरा करुन देखील त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली जात असल्याने टीका होत आहे. वाढदिवसाला लोकांच्या गर्दीसह पोलिसांची हजेरी होती, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस दाखवतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

‘जेवढे आमचे नगरसेवक फोडाल त्यापेक्षा तुपटीने तुमचे फोडू’, गणेश नाईकांचा शिवसेनाला इशारा

(Navi Mumbai Shivsena Leader Suresh Kulkarni Birthday Celebration amid Corona Lockdown sparks criticism)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.