खुलेआम दहशत माजवण्याचा प्रकार, रहिवाशावर जीवघेणा हल्ला! घणसोलीत काय चाललंय काय?

Navi Mumbai : या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. याप्रकारानं संपूर्ण घणसोलीत खळबळ उडाली आहे. सध्या दिलीप चिकणे यांच्यावर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

खुलेआम दहशत माजवण्याचा प्रकार, रहिवाशावर जीवघेणा हल्ला! घणसोलीत काय चाललंय काय?
घणसोलीत भररस्त्यात तुफान राडा
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 8:31 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोलीत (Ghansoli, Navi Mumbai) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या निवडणुकीवरुन दहशत माजवण्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी जमावानं एकावर जीवघेणा हल्ला केलाय. याप्रकरणी आता पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आता पोलिस याप्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय. घणसोलीच्या सिम्लेक्स इथं असलेल्या माऊलीकृपा सोसायटीतील दिलीप चिकणे या रहिवाशावर जीवघेणा हल्ला (Shocking attack on residence) कऱण्यात आला. सौरभ शिंदे आणि त्यांच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आलून पोलिस संरक्षण मिळावं, अशी मागणी करण्यात आली आहे. दहशत (Terror) माजवण्याच्या या प्रकरामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. माऊलीकृपा सोसायटी संचालकपदाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गुंडगिरी सुरु असल्याचं बोललं जातंय.

निवडणुकीमुळे राडा

सोसायटीच्या निवडणुकीत बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा हस्तक्षेप सुरू आहे, असा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय. सोसायटीत माघी गणेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. धार्मिक उत्सवादरम्यान सोसायटीचे वातावरण शांत रहावे, यासाठी दिलीप चिकणे यांनी काही व्यक्तींना समजाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी निवडणुकीत परिवर्तन पॅनल उभे करणारे सौरभ शिंदे हे त्यांच्या गुडांना तेथे घेवून आले आणि त्यांनी चिकणे यांच्यावर हल्ला चढवला, असा आरोप करण्यात आलाय.

चिकणे यांना यावेळी गुंडांनी रस्त्यावरच जबर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. याप्रकारानं संपूर्ण घणसोलीत खळबळ उडाली आहे. सध्या दिलीप चिकणे यांच्यावर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चिकणे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी रस्त्यावरच जबर मारहाण करण्यात आली आहे. मोठा जमाव यावेळी पाहायला मिळाला. आधी बाचाबाची आणि मग मारहाण अशा प्रकारानं सगळेच हादरुन गेले होते.

पोलिस संरक्षणाची मागणी

दरम्यान सोसायटीच्या निवडणुकीत बाहेरील गुंडांचा वाढता हस्तक्षेप पाहता सोसायटी निवडणुक लढविणारे उन्नती पॅनलने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सोसायटीमध्ये पोलिस बंदोबस्त करण्याची मागणी उन्नती पॅननं पोलिसांकडे केली आहे. आगामी नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा सगळा राडा झाला असल्याची कुजबूज ऐकायला मिळते आहे. सोसायटीच्या निवडणुकीवरुन झालेल्या राड्यामुळे एकूण रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर उलटला, नवी मुंबईतल्या पाम बीचवर मोठा अपघात

Cidco Lottery : सिडकोकडून तळोजा येथील 5730 घरांसाठी लॉटरी जाहीर, एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं आवाहन

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.