दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर उलटला, नवी मुंबईतल्या पाम बीचवर मोठा अपघात

नवी मुंबई येथील पाम बीच मार्गावर (Palm Beach Road) कोपरी गावाजवळ कंटेनर उलटल्याने अपघात (Container Accident) झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली आहे.

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर उलटला, नवी मुंबईतल्या पाम बीचवर मोठा अपघात
Navi Mumbai accident
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 3:12 PM

नवी मुंबई : येथील पाम बीच मार्गावर (Palm Beach Road) कोपरी गावाजवळ कंटेनर उलटल्याने अपघात (Container Accident) झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली आहे. मालाने भरलेला कंटेनर वाशीतल्या एपीएमसी मार्केट मधून ठाण्याच्या दिशेने जात होता. यावेळी कोपरी गावाचा सिग्नल क्रॉस करत असताना अचानक बाईकस्वार मध्ये आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबला. त्यावेळी कंटेनर रस्त्यावर पालटला. यात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर वाहतूक पोलीस कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Container accident at palm beach road Navi Mumbai)

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण (Pune Accident) अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा (Police) यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले आहे.

चालकाचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळली. अति वेगात असणाऱ्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरखाली ही कार घुसली. यामुळे कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्वच म्हणजेच पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्या 

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; मुख्यमंत्री उत्तर देणार काय?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, पुण्याची प्रभागरचना 1 फेब्रुवारीला तर नागपूरचा निर्णय लवकरच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.