NM Child Death : नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू, मनसेने प्रशासनाला धरले धारेवर

| Updated on: May 09, 2022 | 5:01 PM

मुलाला रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे तेथील टेक्निशियनने मुलाला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर मुलाचा तात्काळ मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने मृत्यू झाल्याचे लपवले आणि मुलावर उपचार सुरु असल्याचे नाटक केले. त्यानंतर आज सकाळी 10.15 वाजता डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

NM Child Death : नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू, मनसेने प्रशासनाला धरले धारेवर
चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्या
Image Credit source: TV9
Follow us on

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : कळंबोलीमधील एमजीएम हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी आदई येथील 4 वर्षांच्या लहान मुलाला पाठीवर गाठ आली होती म्हणून उपचारासाठी आणले होते. यावेळी रविवार असल्यामुळे बहुतांश डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजर नव्हते. त्यामुळे त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या टेक्निशियनने त्या मुलाला इंजेक्शन (Injection) दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पीडित कुटुंब मूळचे नेपाळचे आहे. मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शन देणारा टेक्निशियन (Technician) फरार आहे. संकेत धुमाळ असे फरार टेक्निशियनचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्हा नोंद करण्यात येईल.

मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शन देणारा टेक्निशिअन फरार

मयत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर चिले यांनी कामोठे पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात ड्युटीवर उपस्थित असेलेल पोलिस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची भेट घेत या प्रकरणात तपास करून व प्रशासनाला दोषी ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करा असे चिले यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. टेक्निशिअन संकेत धुमाळ फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रुग्णालय प्रशासन याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. मनसे नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे तेथील टेक्निशियनने मुलाला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर मुलाचा तात्काळ मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने मृत्यू झाल्याचे लपवले आणि मुलावर उपचार सुरु असल्याचे नाटक केले. त्यानंतर आज सकाळी 10.15 वाजता डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलाचा मृतदेह पनवेलच्या नाना धर्माधिकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा