सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार नेरुळ परिसरात सापळा लावून सुभाष शितलाप्रसाद केवट, मगबुल जोमू शेख उर्फ चिरा, राजू मारूती वंजारे आणि दागिने वितळून देणारा आसित कालीपदो दास याला शिताफीने अटक केली. एकूण 3,25,00 रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.

सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कारवाई
सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कारवाई

पनवेल : नवी मुंबई, पालघर येथील मंदिरांतील मूर्ती, देवाचे चांदिचे मुकुट, पादुका, दानपेटीतील रोख रक्कम चोरी करणारे तसेच पार्क केलेल्या मोटार वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 किलो 350 ग्रॅम चांदी आणि 24 बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. (Criminal gang arrested, Navi Mumbai Crime Branch Central Cell action)

नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवून केली कारवाई

नवी मुंबई परिसरातील मंदिरामधील देवाचे दागिने, वस्तू तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरीला जात असल्याचे गुन्हे घडत होते. त्यामुळे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रविणकुमार पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी विशेष मोहीम राबवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास चालू असताना, मध्यवर्ती कक्षाचे सपोनि राजेश गज्जल व पोलीस शिपाई राहुल वाघ यांना मंदिरांमध्ये चोरी करणारे सराईत आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

नेरुळ परिसरात सापळा रचून आरोपींना केले जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार नेरुळ परिसरात सापळा लावून सुभाष शितलाप्रसाद केवट, मगबुल जोमू शेख उर्फ चिरा, राजू मारूती वंजारे आणि दागिने वितळून देणारा आसित कालीपदो दास याला शिताफीने अटक केली. एकूण 3,25,00 रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, जी.डी. देवडे, व पोलीस अमलदार नितीन जगताप, सतीश सरफरे, आतिष कदम, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम, राहुल वाघ, व विजय खरटमोल यांनी पार पाडली. (Criminal gang arrested, Navi Mumbai Crime Branch Central Cell action)

इतर बातम्या

‘भाजप भ्रष्टाचाराचं केंद्र, इंधन दरवाढीचं खापर काँग्रेसवर फोडून जनतेची दिशाभूल सुरु’, नाना पटोलेंचा घणाघात

Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI