Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

प्राणी तसेच पक्ष्यांशी निगडीत व्हिडीओ या मंचावर मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये कुत्र्यांमुळे त्यांच्या मालकीनीची चांगलीच फजिती उडाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?
WOMEN DOG ATTACK

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्राणी तसेच पक्ष्यांचे व्हिडीओ या मंचावर मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये कुत्र्यांमुळे त्यांच्या मालकीनीची चांगलीच फजिती उडाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

पाळलेला कुत्राच बनला महिलेची डोकेदुखी

नेटकऱ्यांना प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आवडतात. प्राण्यांची मस्ती तसेच त्यांनी केलेली खोडी मूड फ्रेश करणारी असते. कदाचित याच कारणामुळे नेटकरी प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहतात. काही लोक तर वेगवेगळ्या प्राण्यांना आपल्या घरी पाळतातसुद्धा. घरात एखादा प्राणी असला की वातावरण प्रसन्न असते. मात्र, हेच प्राणी कधीकधी डोकेदुखी होऊन बसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या बाबतीतही तेच झाले आहे. कुत्र्यांमुळे व्हिडीओतील महिला जमिनीवर चांगलीच कोसळली आहे. (dog attack woman while playing got injured video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला तिने पाळलेल्या कुत्र्यांसोबत खेळत आहे. खेळत असताना ती एका जागेवर लपली आहे. तसेच कुत्र्यांनी पाहिल्यावर व्हिडीओतील महिला गार्डनवर पळायला लागल्याचे आपल्याल दिसतेय. त्यानंतर मात्र महिलेची चांगलीच फजिती झाली आहे. महिला समोर पळत असताना कुत्र्यांनी तिच्यावर झेप घेतली आहे. कुत्र्यांनी झेप घेतल्यामुळे महिला जोरात खाली आदळली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला आपल्या सोशल मीडिया अकाऊटंवर शेअरसुद्धा केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या :

Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !

Video | भावाच्या लग्नात बहिणीचा जलवा, पाहुण्यांसमोर स्टेजवर केला धमाकेदार डान्स

Video | टायमिंग परफेक्शनचा मास्टर, पठ्ठ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणतात ही तर जादू !

(dog attack woman while playing got injured video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI