Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?

एक स्टंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटदरम्यान तरुणाचा भीषण अपघात झालाय. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?
MAN STUNT VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 19, 2021 | 7:26 PM

मुंबई : आपल्या घरासमोर एखादी महागडी गाडी असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हे स्वप्न काही लोक प्रत्यक्षात जगतातसुद्धा. या लोकांकडे एकापेक्षा एक गाड्या असतात. याच महागड्या गाड्यांवर बसून तरुण-तरुणी थरारक स्टंट करतात यावेळी असाच एक स्टंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटदरम्यान तरुणाचा भीषण अपघात झालाय. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (man doing stunt on sport bike video went viral on social media)

तरुणाचा हायवेवर थरारक स्टंट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण स्पोर्ट बाईकवर बसला असून तो हायवेवरुन जात असल्याचे दिसतेय. यावेळी तो दुचाकीचे समोरचे चाक वर हवेत उचलत स्टंट करत आहे. विशेष म्हणजे एक चाक हवेत असतानादेखील व्हिडीओतील तरुण दुचाकी वेगात चावलतो आहे. या तरुणाच्या मागे एकजण व्हिडीओ शूट करत आहे.

अपघातानंतर तरुण रस्त्यावर फरफटत गेला 

व्हिडीओतील तरुण स्टंट करण्यामध्ये सुरुवातीला यशस्वी ठरल्याचे आपल्याला दिसतेय. मात्र, थोडे अंतर कापल्यानंतर या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आहे. परिणामी हा तरुण दुचाकीवरुन खाली पडला आहे. दुचाकी वेगात असल्यामुळे व्हिडीओतील तरुणसुद्धा रस्त्यावर फरफटत गेला आहे. तरुण खाली पडल्यानंतर दुचाकी रस्त्यावर चालकाविनाच धावत आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच जीवाची बाजी लावून असे स्टंट करु नयेत, अशी प्रतिक्रिया काही नेटकरी देत आहे. वाहनांची ये-जा असलेल्या रस्त्यावर अशी स्टंटबाजी करणे चुकीचे असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ना योगा ना डायट, एका झटक्यात वजन केलं कमी, महिलेची करामत पाहून नेटकरी चक्रावले

Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | कशाचाही विचार न करता तरुणीने सापाला पकडलं, पुढं काय झालं एकदा पहाच

(man doing stunt on sport bike video went viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें