Video | भर मंडपात नवरदेवाला तरुणीची मारहाण, वऱ्हाडी मंडळी अवाक्, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 7:47 AM

सध्या तर एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. भर लग्नमंडपात नवरदेवाला एका तरुणीने चांगलाच मार दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video | भर मंडपात नवरदेवाला तरुणीची मारहाण, वऱ्हाडी मंडळी अवाक्, व्हिडीओ व्हायरल
viral video

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. भर लग्नमंडपात नवरदेवाला एका तरुणीने चांगलेच चोपले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (girl beating groom in marriage function video went viral on social media)

तरुणीने नवरदेवाला थेट धक्का-बुक्की सुरु केली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेव लग्नमंडपात उभा असल्याचे दिसत आहे. नवरदेवाच्या बाजूला त्याच्या मित्रांनी गर्दी केलीय. असे असतानादेखील स्टेजवर चढून एक तरुणी नवरदेवाकडे आल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. या तरुणीने नवरदेवाला थेट धक्का-बुक्की सुरु केली आहे. एवढंच नाही तर नवरदेवाच्या अंगावरील फेटा आणि रुमाल ही तरुणी धरून ओढत आहे.

व्हिडीओतील तरुणी कोणालाही दाद देत नाहीये

तरुणीचे हे रौद्र रुप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ही तरुणी नवरदेवाला अशा प्रकारे का मारत आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तरुणीचा राग पाहून तिला सावरण्यासाठी स्टेजवर काही लोक आल्याचे आपल्याला दिसत आहे. असे असले तरी व्हिडीओतील तरुणी कोणालाही दाद देत नाहीये. ती जोरात नवरदेवाला मारत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओला हजारोंनी लाईक्स असून नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार

Video | दोन तरुणींची एकमेकींसोबत मस्ती, मध्येच घडला विचित्र प्रकार, मजेदार व्हिडीओ व्हायरल

Viral Video | हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडिओ झाला व्हायरल

(girl beating groom in marriage function video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI