Viral Video | हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (आरजीव्ही) ने एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर करून तालिबान्यांना टोला लगावला. या व्हिडिओमध्ये तालिबानी समर्थक लहान मुलांच्या खेळण्यांसह तर कुठे जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.

Viral Video | हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडिओ झाला व्हायरल
हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. येथील लोकांना भीती आणि दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडायचे आहे. तालिबानने काबूलमध्ये कब्जा केल्यापासून राजधानी आणि काबूल विमानतळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडीओमध्ये त्यांना राष्ट्रपती भवनवर कब्जा करताना दाखवण्यात आले आहे, तर काही व्हिडिओ सोशल मीडियावर राईड करताना, ट्रॅम्पोलिनवर उडी मारताना आणि विचित्र पद्धतीने जिम करताना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात तालिबानी टॉय कारवर मजा करताना दिसत आहे. (The video of the Taliban driving a toy car with a gun in hand went viral)

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये तालिबानी हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसत आहेत, तर कधीकधी जंपिंग जॅक मजा करताना दिसत आहेत. हजारो निरपराध लोकांना ठार मारल्यानंतर आणि लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तालिबान्यांना ही मजा येत असल्याचे पाहून खरोखरच भयावह वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड स्टार्सनी ट्विटद्वारे अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (आरजीव्ही) ने एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर करून तालिबान्यांना टोला लगावला. या व्हिडिओमध्ये तालिबानी समर्थक लहान मुलांच्या खेळण्यांसह तर कुठे जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.

राम गोपाल वर्मांचे ट्विट

राम गोपाल वर्मा यांनी अश्रूवाल्या इमोजीसह व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, शेवटी सर्व सत्य… तालिबानी फक्त बच्चे आहेत… हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक तालिबानींची नींदा करीत आहेत, तर काही लोक ते तालिबानी असल्याची पुष्टी कशी कराल? असा सवाल विचारत आहेत. (The video of the Taliban driving a toy car with a gun in hand went viral)

इतर बातम्या

गाडगेबाबांचे विचार जगभर पोहोचवण्याची गरज; ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

आरबीआयचा एचडीएफसी बँकेला मोठा दिलासा, क्रेडिट कार्डवरील बंदी उठवली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI