Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 4:52 PM

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अशीच एक गंभीर घटना घडली आहे. येथे एका महिलेसोबत तीनेशे ते चारशे लोकांनी असभ्य व्यवहार केला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार काही लोकांनी तिचे कपडेसुद्धा फाडले.

Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार
PAKISTANI GIRL HARASSMENT
Follow us

मुंबई : पाकिस्तानच्या क्रुरतेचे अनेक किस्से जगाला माहिती आहेत. यातील काही घटना तर हादरवून सोडणाऱ्या आहेत. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अशीच एक गंभीर घटना घडली आहे. येथे एका महिलेसोबत तीनेशे ते चारशे लोकांनी असभ्य व्यवहार केला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार काही लोकांनी तिचे कपडेसुद्धा फाडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (pakistani women thrown into air and clothes torn by mob video went viral on social media)

लोकांनी महिलेला उचलून हवेत फेकले

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडओ हा पाकिस्तानमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या मित्रांसोबत लाहोर येथील मीनार-ए-पाकिस्तान या ठिकाणी टिकटॉक व्हिडीओ तयार करत होती. यावेळी काही लोकांनी व्हिडीओतील महिला तसेच तिच्या मित्रांवर हल्ला केला. गर्दी जास्त असल्यामुळे महिलेला तसेच तिच्या मित्रांना काहीही करता आले नाही. परिणामी काही लोकांनी या महिलेला वर उचलून हवेत फेकले. महिलेला हवेत फेकण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

लाहोर पोलिसींनी केला 400 लोकांविरोधात गुन्हा दाखल

ही घटना घडल्यानंतर महिलेने याविषयी लाहोर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असली तरी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ सगळीकडे पसरल्यामुळे पाकिस्तानविषयी जगभरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकतं, नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया 

एका महिलेला चारशे लोकांच्या मॉबने हवेत फेकणे तसेच तिचे कपडे फाडणे घृणास्पद कृत्य असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. काही लोकांनी तर पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकतं. या देशातील माणूसकी मेली आहे, अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी पाकिस्तानविरोधात आक्रमक झाले असून ट्विटरवर #MinarePakistan हा हॅशटॅक ट्रेंडिंगवर आहे.

इतर बातम्या :

Video | दोन तरुणींची एकमेकींसोबत मस्ती, मध्येच घडला विचित्र प्रकार, मजेदार व्हिडीओ व्हायरल

VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचाच उडाला थरकाप, मुलींनी नेमकं काय केल; हा व्हायरल व्हिडिओ पाहाच!

Viral Video | हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडिओ झाला व्हायरल

(pakistani women thrown into air and clothes torn by mob video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI