Video | दोन तरुणींची एकमेकींसोबत मस्ती, मध्येच घडला विचित्र प्रकार, मजेदार व्हिडीओ व्हायरल

सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची शॉर्ट व्हिडीओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे. व्हिडीओ तयार करताना तरुणीच्या अंगावर सॉफ्ट ड्रिंग पडले आहे.

Video | दोन तरुणींची एकमेकींसोबत मस्ती, मध्येच घडला विचित्र प्रकार, मजेदार व्हिडीओ व्हायरल
girls viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 18, 2021 | 4:11 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमध्ये काही मजेदार गोष्टी दाखवलेल्या असतात की त्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची शॉर्ट व्हिडीओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे. व्हिडीओ तयार करताना तरुणीच्या अंगावर सॉफ्ट ड्रिंग पडले आहे. (girl making fun while shooting short video funny moment went viral on social media)

मेकअप करुन तरुणी शॉर्ट व्हिडीओचं शूटिंग करत आहेत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुणी नटून-थटून बसल्याचे दिसत आहे. मेकअप करुन त्या कॅमेऱ्यासमोर शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. यामध्ये एका तरुणीच्या हातात सॉफ्ट ड्रिंक आहे. ती सॉफ्ट ड्रिंकचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरी एक तरुणी तिच्या बाजूला उभी राहून कॅमेऱ्याकडे पाहत वेगवेगळ्या पोज देत आहे. तिच्या डोळ्यांना चस्मा आहे. तसेच आकर्षक कपडे परिधान करुन ती पोज देत आहे. मात्र, याच वेळी एक मजेदार किस्सा घडला आहे. पहिली तरुणी झाकण उघडत असताना सॉफ्ट ड्रिंक थेट दुसऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावर उडाले आहे.

तरुणीच्या चेहऱ्यावर सॉफ्ट ड्रिंक उडाले

चेहऱ्यावर सॉफ्ट ड्रिंग उडताच दुसरी तरुणी चांगलीच गोंधळली आहे. तिच्या चेहऱ्यावर तसेच अंगावरसुद्धा सगळीकडे सॉफ्ट ड्रिंग झाले आहे. हा सर्व प्रकार अचानक घडल्यामुळे एक तरुणी रागात ओरडल्याचे आपल्याला दिसतेय. नंतर हा मजेदार किस्सा घडल्यानंतर दोन्ही तरुणी आनंदाने हसत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सर्व गोष्टी अचानकपणे घडल्यामुळे या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर memezar या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचाच उडाला थरकाप, मुलींनी नेमकं काय केल; हा व्हायरल व्हिडिओ पाहाच!

Viral Video | हातात बंदूक घेऊन टॉय कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडिओ झाला व्हायरल

मित्राच्या लग्नात भन्नाट गिफ्ट, नेटकरी म्हणतात नवरदेवाला आयुष्यभर कमाईची गरज नाही, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

(girl making fun while shooting short video funny moment went viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें