मुंबई : माणून आणि प्राणी हे एकमेंकांशी बोलू शकत नसले तरी केवळ भावना समजूनही अनेकदा दोघांमध्ये एक वेगळेच नाते तयार होत असते. अनेक पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर आणि त्यांच्या मालकांतील नातं मन जिंकणारं असतं. प्राणी आपल्या मालकासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. असंच एक मुलगी आणि तिच्या घोड्यातील गोड नातं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.