मित्राच्या लग्नात भन्नाट गिफ्ट, नेटकरी म्हणतात नवरदेवाला आयुष्यभर कमाईची गरज नाही, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील

Updated on: Aug 18, 2021 | 8:15 AM

सोशल मीडियावर दररोज मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर निंयत्रण राहत नाही.

मित्राच्या लग्नात भन्नाट गिफ्ट, नेटकरी म्हणतात नवरदेवाला आयुष्यभर कमाईची गरज नाही, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
नवरदेवाच्या मित्राची धमाल

सोशल मीडियावर दररोज मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर निंयत्रण राहत नाही. सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. व्हिडीओला लाईक्स आणि व्हिव्ज वाढत आहेत.

नवरदेवाच्या मित्राची धमाल

साधारणपणे लग्न म्हणलं की त्यावेळी नवरदेवाचे मित्र जास्त आनंद घेत असतात. काही वेळा ते नवरदेव आणि नवरीची चेष्टा मस्करी करतात याचा त्रास वऱ्हाडी मंडळींना होत असतोय. नवरदेव मित्राला त्रास देणाऱ्या एका मित्राचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही नवरदेवाच्या मित्राची करामत पाहून तुम्हाला नक्कीच हासू आवरणार नाही.

मित्र मागे काय करतोय?

व्हिडिओमध्ये तूम्ही पाहू शकता की नववधू आणि नवरदेव आरामात बसलेले आहेत. यावेळी मागं उभा असलेला नवरदेवाचा मित्र त्याची मज्जा घेतोय. यावेळी तो नवरदेव आणि नवरीच्या डोक्यावर नाणं ठेवतो आणि कॅमेरासमोर पोझ देत आहे. खुर्चीवर बसलेल्या नवरा नवरी काय घडतंय हे माहिती नसतंय. त्यानंतर तो मित्र ती नाणी नवरदेवाच्या हातात देतो. यावेळी नवरेदव त्याला समजावून सांगतो.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस

हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पंसतीस येत आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं नवरदेवाला आयुष्यभर त्याच्या मित्रानं दिलेल्या भेटीमुळे कमवण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर, दुसरा नेटकरी म्हणाला हा मित्र नवरदेवाचा बदला घेत असावा. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंटस करत आहेत. हा मजेदार व्हिडिओ सत्यपाल सिंह सत्यपाल यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. ज्याने त्याने कॅप्शन लिहिले की या भावाने हनीमूनचे संपूर्ण पॅकेज भेट दिले आहे. या व्हिडिओला 50 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

इतर बातम्या:

VIDEO : रडणाऱ्या मालकिणीचा मूड ठिक करण्यासाठी घोड्याने केले असे काही, नेटकरी बघून म्हणतात ‘दोस्ती असावी तर अशी’

VIDEO : नाचता-नाचता पँट निसटली, तरीही आजोबांनी वेळ मारुन नेली, भन्नाट व्हिडीओ

Groom friend giving coin as wedding gift video goes viral on social media

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI