Video | कशाचाही विचार न करता तरुणीने सापाला पकडलं, पुढं काय झालं एकदा पहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. व्हिडीओतील तरुणीने कशाचाही विचार न करता एक मोठा साप हातात धरला आहे.

Video | कशाचाही विचार न करता तरुणीने सापाला पकडलं, पुढं काय झालं एकदा पहाच
snake viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. हे माध्यम प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असल्यामुळे येथे रोज वेगवेगळे व्हिडीओ चर्चेत येतात. या मंचावर एखाद्या प्राण्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. तर कधी एखाद्या तरुण आणि तरुणीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. व्हिडीओतील तरुणीने कशाचाही विचार न करता एक मोठा साप हातात धरला आहे. (girl picked up big snake with naked hands video went viral on social media)

सर्वांनाच सापाची भीत वाटत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक माणूस दिसतो. हा माणूस रस्त्याची साफसफाई करतोय. रस्ता साफ करताना तो समोर आलेल्या सापाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतोय. सापाला हात लावण्याची भीती वाटत असल्यामुळे तो हातातील काठीने सापाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, याच वेळी व्हिडीओमध्ये एक तरुणी आल्याचे आपल्याला दिसतेय.

तरुणीने सापाला थेट हातात पकडले

व्हिडीओतील सापाला हात लावण्यास सगळे घाबरत आहेत. खुद्द साफसफाई करणारादेखील काठीने सापाला बाजूला करतोय. मात्र, तरुणीने कशालाही न घाबरता सापाला हातात धरले आहे. सापाला हातात घेत तरुणी त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या तळ्याकडे गेल्याचे आपल्याला दिसतेय. हा सर्व प्रकार पाहून बाजूला ऊभे असलेले लोक अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला ट्विटरवर
Ffs OMG Vids या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

VIDEO : विधींच्या दरम्यान नवरी गोंधळली, नंतर असं काही झालं की हे पाहून नातेवाईक देखील हैराण झाले!

Video | भर मंडपात नवरदेवाला तरुणीची मारहाण, वऱ्हाडी मंडळी अवाक्, व्हिडीओ व्हायरल

Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार

(girl picked up big snake with naked hands video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI