AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भावाच्या लग्नात बहिणीचा जलवा, पाहुण्यांसमोर स्टेजवर केला धमाकेदार डान्स

सध्या अशाच एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | भावाच्या लग्नात बहिणीचा जलवा, पाहुण्यांसमोर स्टेजवर केला धमाकेदार डान्स
VIRAL VIDEO
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 20, 2021 | 8:11 AM
Share

मुंबई : लग्न असलं की घरातील वातावरण वेगळंच असतं. त्यातही भावाचे लग्न असल्यास त्याचा आनंद काही औरच असतो. आपल्या भावाच्या लग्नाची सर्वात जास्त खुशी बहिणीलाच असते. सध्या अशाच एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (young girl doing fantastic dance in his brothers marriage video went viral on social media)

वराच्या बहिणीचा मंडपातच धमाकेदार डान्स

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाची बहीण नाचत असल्याचे आपल्याला दिसत आहे. भावाचे लग्न असल्यामुळे स्टेजवर ती बिनधास्त होऊन डान्स करत आहे. वराच्या बहिणीने डान्स करताना चमकदार लेहेंगा आणि डोळ्यांवर चष्मा लावला आहे. चष्मा लावून वराची बहीण धमाकेदार डान्स करत आहे. डान्स करतानाचे तिचे हावभाव आणि तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळी तसेच इतर पाहुणे नवरदेवाच्या बहिणीचा डान्स पाहत आहेत. टाळ्या वाजवून ते तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

सोशल मीडियावर नवरदेवाच्या बहिणीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. हा डान्स पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या मजेदार व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला dillidanceduo या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?

Video | ना योगा ना डायट, एका झटक्यात वजन केलं कमी, महिलेची करामत पाहून नेटकरी चक्रावले

Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

(young girl doing fantastic dance in his brothers marriage video went viral on social media)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!