Video | टायमिंग परफेक्शनचा मास्टर, पठ्ठ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणतात ही तर जादू !

काही व्हिडीओ तर आपल्याला चकित करणारे असतात. सध्या एका माणसाचे असेच काही आश्चर्यात पाडणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील माणसाची कलाकारी आणि टायमिंग परफेक्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

Video | टायमिंग परफेक्शनचा मास्टर, पठ्ठ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणतात ही तर जादू !
man timing perfection viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 20, 2021 | 7:57 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर आपल्याला चकित करणारे असतात. सध्या एका माणसाचे असेच काही आश्चर्यात पाडणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील माणसाची कलाकारी आणि टायमिंग परफेक्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. (man perfect timing and special trick video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या एका माणसाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये त्याच्या कलाकारीचे कौतूक होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंना पाहून कोणीही म्हणेल की हा एडिटिंगचा एक प्रकार आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहायचं झालं तर या व्हिडीओंमध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करण्यात आलेले नाही. फक्त टीव्हीवर चालत असलेल्या व्हिडीओसोबत हा माणूस टायमिंग परफेक्शन साधत आहे.

माणूस विमान टीव्हीच्या स्क्रीनकडे फेकत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये माणसाने एक छोटं विमान उचलल्याचं दिसतंय. हे एक खेळणं आहे. विमान हातात घेत तो टिव्हीच्या एका बाजूला गेला आहे. तसेच हातातील विमान टीव्हीकडे फेकल्यानंतर तेच विमान टीव्हीच्या स्क्रीनवर आल्याचे आपल्याला दिसत आहे. हा सर्व प्रकार आपल्याला आश्चर्यचिकत करणारा आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा

व्हिडीओतील माणूस जे काही करत आहे, ती कसलीही जादू नाही. तसेच यामध्ये कुठलीही हातचलाखी नाही. उलट आपल्या कलेच्या जोरावर तो माणूस असे व्हिडीओ तयार करतो. सर्वांना वेडावून सोडणारा हा माणूस नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

इतर बातम्या :

Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?

Video | ना योगा ना डायट, एका झटक्यात वजन केलं कमी, महिलेची करामत पाहून नेटकरी चक्रावले

Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

(man perfect timing and special trick video went viral on social media)


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें