VIDEO: कमळाचं डिझाईन, अद्ययावत सुविधा, पाहा कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन

VIDEO: कमळाचं डिझाईन, अद्ययावत सुविधा, पाहा कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai International Airport - NMIA) अंतिम डिझाईन लाँच करण्यात आलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 10, 2021 | 11:07 PM

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai International Airport – NMIA) अंतिम डिझाईन लाँच करण्यात आलंय. जीव्हीके समुहाने (GVK Group) नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं असेल आणि त्यात काही सोयी सुविधा असतील याचा एक सविस्तर व्हिडीओच जारी केलाय. यात विमानतळाच्या डिझाईनपासून अनेक गोष्टींची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे या विमानतळाचं डिझाईन कमळाच्या फुलाप्रमाणे करण्यात आलंय. जहा हदीद या आर्किटेक्चरल कंपनीने हे डिझाईन केलं आहे (Design of Navi Mumbai International Airport – NMIA launch by GVK group).

या विमानतळात एकमेकांशी जोडलेले 3 टर्मिनल असतील. याच्या केंद्रस्थानी सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स असणार आहे. हे विमानतळ दरवर्षी जवळपास 9 कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकेल असंही सांगण्यात आलंय. या विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी प्रवेशद्वार असणार आहे. हे विमानतळ एकूण 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या बांधण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची लँडिंग आणि टेकऑफ एकाचवेळी करता येऊन विमानांची अधिक सोय होईल आहे.

विमानतळापर्यंत लोकल रेल्वे, मेट्रोचीही कनेक्टिव्हीटी असणार

विशेष म्हणजे या भागातील प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहचण्याची वेगवान वाहतूक व्यवस्था असावी म्हणून एक्सप्रेस हायवेपासून सबअर्बन रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीचीही व्यवस्था केली जाणार आहे. 9+9 रेल्वेमार्गाचं सेंट्रल रेल्वे टर्मिनल उभारण्याचंही नियोजन करण्यात आलंय. या विमानतळात 88 चेक इन पॉईंट्स असणार आहेत. याशिवाय 26 इमिग्रेशन डेस्क, 29 एरोब्रिजेसही असणार आहेत.

नवी मुंबई विमानतळाचं डिझाईन पाहा :

हेही वाचा :

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत सेनेत एकमत, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर

Design of Navi Mumbai International Airport – NMIA launch by GVK group

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें