एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण, जवळपास 50 टक्के माल पडून

मुंबई APMC भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा 24 ते 40, फ्लॉवर 10, भेंडी 20, गाजर 10, शिमला 20, फ्लावर 12, टोमॅटो 30, मिरची 20, कोबी 12, दुधी 10, वांगी 10, कारली 10 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर 5 आणि मेथी 5 रुपये जुडी होती.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण, जवळपास 50 टक्के माल पडून
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण

नवी मुंबई : अवकाळी पाऊस थांबला असला तरी या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. भाज्या, फळे, धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पडून राहिलेला माल शेतकऱ्यांनी तोडणी करून पाठवल्याने आज मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला आहे. नियमित सरासरी 600 गाडी आवक भाजीपाला बाजारात येतो. मात्र आज अंदाजे 800 गाडी आवक भाजीपाला बाजारात आला. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

भाजीपाला बाजारात 50 टक्के शेतमाल पडून

सकाळी 40 रुपये प्रति किलो विकला गेलेला वाटाणा दुपारपर्यंत 24 रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना विकावा लागला. शिवाय इतर भाजीपाला 10 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास 50 टक्के शेतमाल पडून असल्याने भाजीपाला खराब होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाचा परिणाम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर आणखी काही दिवस भाजीपाला दर स्थिर राहतील असे सांगण्यात येत आहे. पावसाने शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने अधिक दराने भाजीपाला विक्री

सध्या वाटण्याचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात वाटाणा बाजारात येत आहे. मात्र, वाटण्याला चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे इतर भाज्यांचे दर देखील कमी झाले आहेत. किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने त्या ठिकाणी भरमसाठ अधिक दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे. मुंबई APMC भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा 24 ते 40, फ्लॉवर 10, भेंडी 20, गाजर 10, शिमला 20, फ्लावर 12, टोमॅटो 30, मिरची 20, कोबी 12, दुधी 10, वांगी 10, कारली 10 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर 5 आणि मेथी 5 रुपये जुडी होती. (Falling prices of vegetables in APMC vegetable market)

इतर बातम्या

Jacqueline Fernandes : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला पुन्हा समन्स, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

St worker strike : एसटीचा संप मिटता मिटेना, निलंबन आणि दगडफेकीने एसटी कर्मचारी हैराण

Published On - 11:43 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI