महापुरानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय, 7 अधिकारी थेट चिपळूण-महाडला वर्ग

| Updated on: Aug 01, 2021 | 6:11 AM

कोकण विभागातील महापुरामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन 7 अधिकाऱ्यांना 3 आठवड्यांसाठी चिपळूण, खेड आणि महाड नगरपरिषद कार्यक्षेत्रात वर्ग करण्यात आलेय.

महापुरानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय, 7 अधिकारी थेट चिपळूण-महाडला वर्ग
chiplun flood
Follow us on

पनवेल : कोकण विभागातील महापुरामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन 7 अधिकाऱ्यांना 3 आठवड्यांसाठी चिपळूण, खेड आणि महाड नगरपरिषद कार्यक्षेत्रात वर्ग करण्यात आलेय. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कामाची जबाबदारी देण्यात आलीय. या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका,ठाणे महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका आणि नगरपरिषद महासंचालनालय मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार, वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त नयना ससाने, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे , पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे , श्रीराम पवार, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथील किरणराज यादव, उपायुक्त, योगेश कडुसकर, उपायुक्त नगरपरिषद प्रशासन अशी या 7 अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात महापुरामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन, स्थानिक नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन कार्याचे समन्वयन, सर्व नागरी सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे, स्वच्छता व अनुषंगिक बाबींचा समन्वय साधणं अशी कामं दिलीत. त्यांना या कामासाठी तीन आठवड्यांसाठी सेवा आदेश करत वर्ग करण्यात आले आहे.

कुणाला कुठल्या नगर परिषदेसाठी वर्ग केले?

चिपळूण नगरपरिषद, जि. रत्नागिरी

1) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महानगरपालिका
2) सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
3) नयना ससाणे, उपायुक्त, वसई विरार महानगर पालिका

खेड नगरपरिषद, जि. रत्नागिरी

4) रंजना गगे, उपायुक्त, पुणे महानगरपालिका.
5) श्रीराम पवार, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

महाड नगर परिषद, जि. रायगड

6) किरणराज यादव, उपायुवत, नगरपरिषद प्रशासनसंचालनालय, मुंबई.
7) योगेश कडुसकर, उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई

या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यां नियंत्रणात राहून ही कामे पार पाडायचे आहेत. स्थानिक अधिकारी, नगरपरिषदेचे संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून तसेच आंतर विभागीय समन्वय सुनिश्चित करून आपत्ती व्यवस्थापनाचे काम पार हे अधिकारी पाडणार आहेत. तसेच आपल्या कामाचे अहवाल संबंधित जिल्हाधिकारी व आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.

हेही वाचा :

450 कर्मचारी, 20 जेसीबी, 20 डंपर-घंटागाड्या, पुरानंतर महाडच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात

पावसामुळे रस्ते खड्ड्यात, सुमारे 1800 कोटी रुपयांचं नुकसान

पूरग्रस्त परिसरातील वीज यंत्रणेला 34 कोटी 68 लाख रुपयांचं नुकसान, नितीन राऊत यांची माहिती

व्हिडीओ पाहा :

Government transfer 7 officers in flood affected area for further work in Chiplun Mahad