AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

450 कर्मचारी, 20 जेसीबी, 20 डंपर-घंटागाड्या, पुरानंतर महाडच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात

महाडच्या स्वच्छतेसाठी स्वतः नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरलेत. ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला शनिवारी मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली.

450 कर्मचारी, 20 जेसीबी, 20 डंपर-घंटागाड्या, पुरानंतर महाडच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 4:11 PM
Share

रायगड : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे महाड शहराला पुराचा तडाखा बसला. मात्र, आता याच महाडच्या स्वच्छतेसाठी स्वतः नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरलेत. ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला शनिवारी मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली. नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी विविध महापालिकांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची जमवाजमव करून शनिवारी सकाळी महाड गाठले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराची 4 भागांत विभागणी केली आणि घरोघरी कर्मचारी पाठवून साफसफाईच्या कामाला सुरुवात केली.

शहराच्या स्वच्छतेसाठी दीड कोटींचा वाढीव निधी जाहीर

एकनाथ शिंदे यांनी कामावर व्यक्तिगत लक्ष दिलं. भर पावसातही या सर्व कामावर स्वतः लक्ष दिलं. त्याचबरोबर शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच 50 लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र, झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेची पथके तैनात

कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहरांना बसला. महाड शहरात आणि बाजारपेठेत 13 फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ती शहर स्वच्छ करण्याची. महाड नगरपालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला. ठाणे महापालिकेचे 150 सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे 120 सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे 100 सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे 30 जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले.

450 कर्मचारी, 20 जेसीबी, 20 डंपर, घंटागाड्या महाडच्या मदतीला

याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, 20 जेसीबी, 20 डंपर, 5 घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे 3 फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे 3 फायर टँकर्स, तसेच ठाणे व खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे.

महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 15 लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले

शनिवारी (31 जुलै) सकाळी 9 वाजता एकनाथ शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रात परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 15 लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत यासाठी आपण स्वतःच या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला. सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

पुढील 2 दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार

पुढील 2 दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

भेदभाव न करता मदत द्या, मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्या; एकनाथ शिंदे यांचा केंद्राला सल्ला

ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका, महापालिका, नगरपालिकांच्या ‘त्या’ अधिकारी कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा कवच

चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी, शहर पुन्हा उभं करण्यासाठी 5 अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती: एकनाथ शिंदे

व्हिडीओ पाहा :

Eknath Shinde take initiative for cleaning of Mahad after flood

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.