…तर वाशीच्या टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागणार

सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या वाशी टोल नाकामधून हजारो वाहनांची ये-जा असते. | fastag toll plaza

...तर वाशीच्या टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागणार
टोल प्लाझा

नवी मुंबई: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी मध्यरात्रीपासून देशातील सर्व टोलनाक्यांवर टोल पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व टोल प्लाझावर fastag च्या माध्यमातून टोलची रक्कम अदा केली जाईल. ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्या वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट रक्कम भरावी लागेल. आजपासून मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व चार चाकी गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे.

सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या वाशी टोल नाकामधून हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र, आता फास्टॅगमुळे वाहनांना टोलनाक्यावर ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2021 पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. वाहनचालकांनीही सकाळपासूनच फास्टटॅग घ्यायला सुरुवात केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आजपुरती शिथीलता

राज्यभरात टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य केले असले तरीही मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर आजच्या दिवशी नियमातून सूट मिळणार आहे. खालापुर टोलनाक्यावर आज फास्टटँगच्या विक्रीसाठी अनेक स्वयंसेवक उभे आहेत. उद्यापासून फास्टॅग नसलेल्या कारचालकांना टोलचे दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.

Fastag म्हणजे काय?

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

Fastag कोणत्या गाड्यांना बसवावा लागणार?

जर आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या कलरची असेल तर तुम्हाला फास्ट टॅग बसवावाच लागेल. जर तुमच्या गाडीला फास्ट टॅग नसेल तर तुम्ही टोला प्लाझा क्रॉस करु शकत नाही. तसंच जर पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर ट्रक असो वा कॅब तुम्हाला Fastag बसवावाच लागेल. दुचाकींना मात्र फास्ट टॅगची काहीही गरज नसेल.

हे ही वाचा :

टोलनाक्यांवर Fastag बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल, आता तुम्हीच ठरवा काय करायचं…!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI