“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती, सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात

कळंबोळीमधील सिडको प्रकल्प सदनिकेचे सार्वजनिक बांधकाम आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 1 हजार 950 लाभार्थींनी सर्व हप्त्यांसह देखभाल आणि दुरुस्ती खर्च भरलेला आहे | Navi Mumbai began to give possession of CIDCO houses

"सर्वांसाठी घरे" या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती, सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात
सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात

नवी मुंबई : सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास आज पासून सुरुवात झाली आहे. कळंबोळीमधील सिडको प्रकल्प सदनिकेचे सार्वजनिक बांधकाम आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 1 हजार 950 लाभार्थींनी सर्व हप्त्यांसह देखभाल आणि दुरुस्ती खर्च भरलेला आहे (Navi Mumbai began to give possession of CIDCO houses).

ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतील – एकनाथ शिंदे

“सिडको महामंडळातर्फे बांधण्यात आलेली ही घरे आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या किंमतीशी तुलना करता अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. अतिशय उत्तम बांधकाम दर्जा असेलली ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतात. या गृहनिर्माण योजनेस केंद्र सरकारकडून लागू असलेल्या अनुदानाचा भार सिडको महामंडळाने उचलला आहे. 1 जुलैपासून घराचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे”, असे सार्वजनिक बांधकाम आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सिडको महामंडळाच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपुर्द करण्याच्या समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्यात आल्या. हा कार्यक्रम कळंबोली, नवी मुंबई येथे मोजक्या मान्यवरांच्या आणि निवडक अर्जदारांच्या उपस्थितीत आणि कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पार पडला.

हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोविड-19 च्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकाऱ्यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोविड काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोविड सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे”.

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन 2018-19 मध्ये 14,838 घरांची योजना सुरू करण्यात आली. सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये 11 ठिकाणी घरे साकारण्यात आली. 14,838 घरांपैकी 5,262 घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9,576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरे 1 बीएचके प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. इतका आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तळोजा येथे 2,862, खारघर येथे 684, कळंबोली येथे 324, घणसोली येथे 528 आणि द्रोणागिरी येथे 864 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे 5,232, खारघर येथे 1,260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 आणि द्रोणागिरी येथे 1,548 घरे उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेतील गृहसंकुलांना भारती शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्याची अभिनव कल्पनाही राबविण्यात आली. सदर योजनेची संगणकीय सोडत दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी यशस्वीरीत्या पार पडली.

Navi Mumbai began to give possession of CIDCO houses

संबंधित बातम्या :

सिडकोला घेराव घालणाऱ्या आजी माजी आमदार-खासदार-मंत्र्यांसह 18 ते 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

नवी मुंबईत वंडर्स पार्क उद्यानाच्या शेजारी उभारणार सायन्स पार्क, सिडकोकडून मनपाची मागणी मान्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI