सिडको लवकरच सात हजार शिल्लक घरांची सोडत काढणार

सिडकोने अडीच वर्षापूर्वी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये 25 हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्याची सोडतही काढण्यात आली असून त्यातील लाभार्थ्यांना 1 जुलैपासून प्रत्यक्ष घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी अर्ज छाननीत बाद ठरलेल्या जवळपास 7 हजार घरांसाठी प्रतिक्षा यादीवरील ग्राहकांना संधी देण्याचे सिडकोने ठरविले आहे.

सिडको लवकरच सात हजार शिल्लक घरांची सोडत काढणार
सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात

नवी मुंबई : सिडकोने अडीच वर्षापूर्वी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये 25 हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्याची सोडतही काढण्यात आली असून त्यातील लाभार्थ्यांना 1 जुलैपासून प्रत्यक्ष घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी अर्ज छाननीत बाद ठरलेल्या जवळपास 7 हजार घरांसाठी प्रतिक्षा यादीवरील ग्राहकांना संधी देण्याचे सिडकोने ठरविले आहे (Navi Mumbai CIDCO will soon vacate the remaining 7000 houses).

सिडकोने 2018 मध्ये जाहीर केलेल्या महागृह योजनेलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. यातील 15 हजार घरांसाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज आले होते. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 2019 मध्ये आणखी सुमारे 9 हजार घरांची सोडत काढण्यात आली. परंतु विविध कारणांमुळे या दोन्ही गृहप्रकल्पातील जवळपास 7 हजार घरे विक्रीविना पडून आहेत.
यामध्ये 4,466 घरे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित करुन त्याची सोडतही काढण्यात आली. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांचासुध्दा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोव्हिड योद्धांसाठी ‘बुक माय सिडको होम’ ही विशेष गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही योजना अद्याप कागदावरच आहे. यातच पुढील चार वर्षात 89 हजार घरे बांधण्याचे सिडकोने जाहीर केले आहे.
त्यातील 40 हजार घरांची एप्रिल महिन्यात सोडत काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु विविध कारणांमुळे हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन योजना जाहीर करण्याअगोदर शिल्लक असलेल्या 7 हजार घरांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. त्यानुसार लवकरच या शिल्लक घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे. यात प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना प्रथम संधी दिली जाणार आहे. त्यामुळे काही तांत्रिक बाबींमुळे अर्ज छाननीत बाद ठरलेल्या ग्राहकांनाही एक संधी देण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतल्याचे समजते.

Navi Mumbai CIDCO will soon vacate the remaining 7000 houses

संबंधित बातम्या :

मुंबई एपीएमसी परिसरात कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक

नवी मुंबई APMC तील घटकांना अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी ‘ग्रोमा’चे राज्यपालांना साकडे 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI