Navi Mumbai : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, नवी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर, 12 हजार बेड्स सज्ज

Navi Mumbai : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, नवी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर, 12 हजार बेड्स सज्ज
Navi-Mumbai-Municipal-Corporation and abhijeet bangar

नवी मुंबई महापालिकेनं वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 12 हजार बेडची सुविधा केली असल्याची माहिती देण्यात आलीय. दुसऱ्या लाटेनंतर बंद करण्यात आलेली कोव्हिड सेंटर्स देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.

सुरेश दास

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 18, 2022 | 6:44 AM

नवी मुंबई : जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासून नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai) क्षेत्रातील दैनंदिन कोरोना बाधितांची (Corona) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेने आधीपासूनच तिस-या लाटेची (Corona Third Wave) पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोव्हिड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुस-या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा वेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्यानं पुन्हा एकदा महापालिका प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. न

कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु

दुस-या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर रुग्णसंख्येत होणारी घट लक्षात घेऊन काही कोव्हीड केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली होती. त्यामध्ये सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर तसेच एमजीएम रूग्णालय सानपाडा कोव्हिड सेंटर आणि सिडको कोव्हिड सेंटरमधील आयसीयू सुविधा कार्यान्वित होती. तथापि रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली इतर केंद्रेही एकेक करून कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

राधास्वामी आश्रम तुर्भे येथे 358 ऑक्सिजन बेड्स तसेच एक्सोर्ट हाऊस तुर्भे येथे 492 ऑक्सिजन बेड्सची दोन्ही डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथे 503 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे नवीन मयुरेश कोव्हिड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच जी डी पोळ रुग्णालय खारघर येथे 450 बेड्स क्षमतेचे नवीन कोव्हीड सेंटरही कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या

राज्यात 31 हजार 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 29 हजार 092 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 94.3 टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर 1.95 वर पोहोचला आहे. तर राज्यात सोमवारी ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे. तर, 959 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

18 January 2022 Panchang : मंगळवारचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण 31 हजारांवर, ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद

Navi Mumbai Municipal Corporation prepares for corona third wave covid centre restart

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें