वाशीतील प्रसिद्ध पबवर पालिकेची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडाची आकारणी  

कोविडमुळे आस्थापनांना निर्बंध लागू असतानाही विनापरवाना सुरू असलेल्या पबवर नवी मुंबई  महापालिकेने कारवाई केली आहे.

वाशीतील प्रसिद्ध पबवर पालिकेची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडाची आकारणी  
House of Lords Pub vashi
हर्षल भदाणे पाटील

| Edited By: Namrata Patil

Jul 26, 2021 | 10:46 AM

नवी मुंबई : कोविडमुळे आस्थापनांना निर्बंध लागू असतानाही विनापरवाना सुरू असलेल्या पबवर नवी मुंबई  महापालिकेने कारवाई केली आहे. वाशी सेक्टर 30 या ठिकाणीही हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याची माहिती मिळताच, पालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून 50 हजारांचा दंड आकारला आहे.

पालिकेकडून पब चालकाला 50 हजारांचा दंड

कोरोनामळे शहरातील सर्वच आस्थापनांना नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांची मर्यादा घालण्यात आली आहे. दरम्यान, शहरात या बेकायदेशीरपणे चालणारे हुक्का पार्लर, पब यांच्याकडून मात्र उघडपणे कायदा हाती घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.

त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी आस्थापना सुरु ठेवून ग्राहकांची गर्दी जमवली जात आहे. अशाप्रकारे वाशी सेक्टर 30 ए येथील हाऊस ऑफ लॉईस हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली असता त्यांनी रात्री 11 च्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पबमध्ये गर्दी असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पालिकेने पब चालकाला 50 हजारांचा दंड आकारला आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात

वाशीत गेल्या 10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार 2442 व्यक्ती/दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे त्याचप्रमाणे 4 वा. नंतर दुकाने / आस्थापना सुरू ठेवणे अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार 22 लाख 88 हजार 300 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली गेली आहे.

किती दंड वसूल?

नवी मुंबई महानगरपलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोव्हिड वर्तन नियमांचे उल्लंघन करणा-या 70583 व्यक्ती / आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लक्ष 59 हजार 150 मात्र इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे. यामध्ये मास्कच्या कारवाईपोटी 29943 व्यक्तींकडून 1 कोटी 50 लक्ष 18 हजार, सुरक्षित अंतर आणि वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2804 आस्थापनांकडून 1 कोटी 16 लक्ष 44 हजार 900 तर सुरक्षित अंतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 36776 व्यक्तींकडून 78 लक्ष 56 हजार 650 रुपये दंड वसूल केला गेला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे 1160 व्यक्तींकडून 11 लक्ष 39 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

(Navi Mumbai municipal took action against House of Lords Pub for violating the Covid rules)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये बंद; ग्राहक, हमाल आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल

नवी मुंबईत अरुण गवळीच्या हस्तकावर थेट कारवाई, एपीएमसी मार्केटमध्ये खंडणी गोळा केल्याप्रकरणी अटक

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें