मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

मोरबे धरण 88 मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. सध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!
Morbe dam

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसापासून नवी मुंबईत दमदारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे मोरबे धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा 62% टक्के झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

लवकरच धरण भरुन वाहू लागेल

मोरबे धरण 88 मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. सध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.

तरीही पाणी जपून वापरा, आयुक्तांचं नागरिकांना आवाहन

नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस झाला. यात दि. 19 व 20 जुलै या दोन दिवसांत धरण क्षेत्रात सव्वा दोनशे मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याने धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरणात सध्या 62 टक्के इतका पाणीसाठा झाला असून या उपलब्ध साठ्यातून 31 जानेवारी 2020 पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल, असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या स्व:तच्या मालकीचं मोरबे धरण

मोरबे धरणाची 450 द.ल. लिटर इतक्या पाणीपुरवठ्याची क्षमता आहे. स्वतः च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्वमालकीच्या मोरबे धरणातून महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. गेल्यावर्षी यावेळेपर्यंत पाणीसाठा कमी होता.

सध्या मोरबे धरणातला पाणीसाठी 62 %, असाच पाऊस पडला तर लवकरच पूर्ण धरण भरेल

यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैपासून पावसाने दमदार एन्ट्री केल्यामुळे गतवर्षीच्या जुलै महिन्यातील तुलनेत यावेळी जुलै महिन्यातच मोरबे धरणात पाणीसाठा वाढला असून अजून काही दिवस पाऊस असाच पडत राहिला तर मोरबे धरण लवकरच भरून वाहू लागेल. दरम्यान, यंदाच्या चालु वर्षात मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत मोरबे धरणात 44 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यात सध्यस्थितीत धरणात जोरदार पर्जन्य झाल्यामुळे हा साठा आता 62 टक्के इतका झाला आहे.

(Heavy Rain in Morbe dam Navi Mumbai)

हे ही वाचा :

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा; मिठी नदीही तुडुंब भरली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI