Palm Beach Accident : पाम बीचवर स्विफ्ट आणि क्रेटाची जोरदार धडक! कारमधले बालंबाल बचावले, गाड्यांचं नुकसान

Navi Mumbai Accident : पाम बीचवरील वाशी जवळ दोन कारची एकमेकांना धडक झाली.वाशीच्या अशोका स्पोर्ट्स सिग्नलवर हा अपघात झाला.

Palm Beach Accident : पाम बीचवर स्विफ्ट आणि क्रेटाची जोरदार धडक! कारमधले बालंबाल बचावले, गाड्यांचं नुकसान
नवी मुंबईत भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:33 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) पाम बीच रोड (Palm Beach Road Accident) हा वाहन चालकांसााठी रेस ट्रॅक आहे की काय, अशी शंका घेतली जातेय. सातत्यानं या मार्गावर अपघाताच्या (Navi Mumbai Accident) घटना समोर येत असतात. आता पुन्हा एक भीषण अपघात पाम बीच रोडवर झाला. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. कारमधील सगळे सुरक्षित आहेत. मात्र या अपघाताची तीव्रता किती जबर होती, याची कल्पना गाड्यांकडे पाहून करता येऊ शकेल. स्विफ्ट कार आणि क्रेटा कार यामध्ये धडक झाली. या धडकेत क्रेटा कारच्या ड्रायव्हरच्या विरद्ध बाजूला स्विफ्टनं धडक दिला. या धडकेत स्विफ्टच्या बोनेटला जोरदार फटका बसला. यात गाड्यांचं मोठं नुकसान झालं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरुन हटवण्यात आलं. थोडक्यात या भीषण अपघातातून कारमधील चालक बचावले आहेत.

अशोका स्पोर्ट सिग्नलवर अपघात

पाम बीचवरील वाशी जवळ दोन कारची एकमेकांना धडक झाली.वाशीच्या अशोका स्पोर्ट्स सिग्नलवर हा अपघात झाला. सिग्नल बंद असल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या अपघातानं पाम बीच मार्गावर बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांना चाप कसा लावायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

प्रवासी किरकोळ जखमी

MH 03 AR 2686 क्रमांकाच्या या स्विफ्ट कारचं या अपघाता मोठं नुकसान झालं. स्विफ्ट कारच्या दर्शनी भागाला या अपघातात मोठा फटका बसला. कारमधील प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झालेत. MH 04 KL 9593 या क्रमांकाच्या गाडीला स्विफ्ट धडकली. यानंतर अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी क्रेनच्या मदतीनं अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य केलंय.

वेग आवरा…

पाम बीच रोडवर फारशी वाहतुकीची कोंडी कधी पाहायला मिळत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेकदा वेगानं वाहनं हाकण्याचे प्रकार पाहायला मिळालेले आहेत. त्यातही अनेकदा रात्रीच्या सुमारास या मार्गावर अपघात झाल्याचं दिसून आलंय. रात्रीच्या वेळी पाम बीच रोडवर सिग्नलही काही ठिकाणी बंद असतात. त्यामुळे वाहन चालक अधिक बेदरकारपणे वाहनं चालवून अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. परिणामी या मार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून कार चालकांना केलं जातंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.