अनाथ मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी पनवेल मनपा 25 हजार रुपये देणार

| Updated on: Sep 08, 2021 | 6:44 PM

यासाठी रीतसर अर्ज महिला महिला व बाल कल्याण विभागाकडे करावा लागेल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत त्याच बरोबर या योजनेसाठी प्रथम येणाऱ्या 25 पालकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अनाथ मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी पनवेल मनपा 25 हजार रुपये देणार
अनाथ मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी पनवेल मनपा 25 हजार रुपये देणार
Follow us on

पनवेल : पनवेल मनपाचे महिला व बाल कल्याण विभागाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत अनाथ तसेच निराधार मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून 25 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2021 नंतर दत्तक घेतलेल्या पालकांनाच घेता येणार आहे. यासाठी रीतसर अर्ज महिला महिला व बाल कल्याण विभागाकडे करावा लागेल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत त्याच बरोबर या योजनेसाठी प्रथम येणाऱ्या 25 पालकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पनवेल मनपाचे आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनतेसाठी ही योजना आणली आहे. (Panvel Municipal Corporation will provide Rs. 25,000 for the adoptive parents of orphan girls)

सदर योजनेसाठी अर्ज मागवले आहेत. नागरिकांनी यात सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या माहितीत कुणी असेल तर सांगावे जेणेकरून त्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल, असे पनवेल महानगरपालिका सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे म्हणाल्या.

यासाठी अटी व शर्ती काय असणार ?

1. कुटुंबाचे महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र / मतदार यादीतील नाव / पाणीपट्टी बिल / वीज बिल / 3 वर्षाचा भाडे करारनामा / पारपत्र (Passport) रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला/ राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (उपरोक्त पैकी कोणताही एक पुरावा)

2. अनाथ मुलांना दत्तक घेतल्याबद्दल न्यायालयाचे आदेश असावेत.

3. अर्जासोबत अलीकडील काळात काढलेला पालक व पाल्याचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावणे अनिवार्य राहील.

4. अर्जासोबत पॅनकार्डची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.

5. मूळ शिधापत्रिका दाखविल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे.

6. अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्वसाक्षांकित केलेली असावीत.

7. दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने लाभ देणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार आयुक्त यांना राहील.

8. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अर्जदाराच्या नावे असणाऱ्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक राहिल.

9. आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक राहिल. (Panvel Municipal Corporation will provide Rs. 25,000 for the adoptive parents of orphan girls)

इतर बातम्या

आता दोन कोटी शेतकऱ्यांचा होणार नाही ‘सन्मान’, राज्यांची कारवाई

Maratha Reservation : तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल