Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील सानपाड्यात संशयित चोरट्याला जमावाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

ललित मोबाईल चोर असून यापूर्वीही या परिसरात टेहाळणी करताना नागरिकांनी त्याला पाहिले होते. मंगळवारीही ललित सनापाडा गाव परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. यावेळी नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे नागरिकांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन चोर पकडल्याची माहिती दिली.

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील सानपाड्यात संशयित चोरट्याला जमावाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबईतील सानपाड्यात संशयित चोरट्याला जमावाकडून मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 1:03 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 5 येथे मंगळवारी एका संशयित चोरास जमावाने मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर जमावाने चोराला डान्स करण्यासाठी देखील सांगितलं होतं. संशयित चोर हा नशेमध्ये होता त्याला जमावाने बांबूने मारहाण केल्याने तो जमिनीवर एका कोपऱ्यात पडला होता. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. सानपाडा पोलीस ठाण्यात कंट्रोलला या मारहाण प्रकरणी फोन आला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू (Death) झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सानपड्यातील 6 जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू

ललित गोयल (27) असे मयत चोरट्याचे नाव आहे. तर मयुरेश नामदेव म्हात्रे (26), कपिश केसरीनाथ पाटील (33), गौरव तुकाराम गवळी (19), निरज अरुण मुळे (21), जितेंद्र चेलाराम मालवी (27), गणेश नामदेव पाटील (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ललित मोबाईल चोर असून यापूर्वीही या परिसरात टेहाळणी करताना नागरिकांनी त्याला पाहिले होते. मंगळवारीही ललित सनापाडा गाव परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. यावेळी नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे नागरिकांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन चोर पकडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गंभीर जखमी चोराला ताब्यात घेतले. पोलिसांनी जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेवेळी ललित दारुच्या नशेत होता. याप्रकरणी सानपाडा पोलिसात जमाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.