मालमत्ता करांचे सर्वाधिक संकलन, एका दिवसात साडे 6 कोटीच्यावर कर संकलन

पनेवल महानगरपालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे. 31 जुलै ही 17 टक्के कर सवलत मिळण्याची शेवटची तारीख असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा कर संकलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.

मालमत्ता करांचे सर्वाधिक संकलन, एका दिवसात साडे 6 कोटीच्यावर कर संकलन
Panvel Municipal corporation

नवी मुंबई : पनेवल महानगरपालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे. 31 जुलै ही 17 टक्के कर सवलत मिळण्याची शेवटची तारीख असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा कर संकलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. आज सहा वाजेपर्यंत सहा कोटींच्यावर कर संकलन झाले असून आजवरचे हे सर्वाधिक कर संकलन आहे. आज नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आसूडगाव या भागामधून सर्वाधिक भरणा होताना दिसून आला. आत्तापर्यंत एकुण 38.87 कोटी मालमत्ता कराचे संकलन झाले आहे.

नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता मालमत्ता धारकांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी आजची शासकिय सुट्टी रद्द करण्यात आली होती. चारही प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले होते. या आवाहनाला पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

आजवर झालेल्या सुनावण्या दरम्यान नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन होत असल्याचे दिसून आले आहे. गेले काही दिवसापासून दिवस व रात्रपाळी मध्ये नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटत असल्याने मालमत्ता कर भरण्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज अखेर पालिकेच्या सर्वच नोडमधून कराचा मोठा भरणा होताना दिसून आले.

31 जुलैचे दैनिक संकलन

नोड                                                                                    एकूण कर संकलन

1. पनवेल                                                                            18 लाख 86 हजार 752

2. नवीन पनवेल,मोठा खांदा, खांदा कॉलनी,आसुडगाव       2 कोटी 61 लाख 90 हजार 786

3. कामोठे                                                                          1 कोटी 18 लाख 85 हजार 717

4. खारघर                                                                          1 कोटी 64 लाख 49 हजार 116

5. कळंबोली, रोडपाली                                                      61 लाख 20 हजार 482

6. तळोजा,पाचनंद,नावडे                                                   15 लाख 61 हजार 114

एकूण कर संकलन                                                             6 कोटी 40 लाख 93 हजार 994

The highest collection of property tax In Panvel Municiple Corporation tax collection Of Rs 6 crore 40 lack in one day

संबंधित बातम्या :

महापुरानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय, 7 अधिकारी थेट चिपळूण-महाडला वर्ग

डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुंबईतील अपीजय शाळेची चौकशी होणार, बच्चू कडूंचे आदेश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI