Tv9 Impact | पनवेलचे सेंट्रल पार्क अखेर बंद, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासनाला जाग

कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्यात येणार आहे. (Panvel central park Close)

Tv9 Impact | पनवेलचे सेंट्रल पार्क अखेर बंद, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासनाला जाग
Tv9 Impact | पनवेलचे सेंट्रल पार्क अखेर बंद
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:48 AM

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यात खारघर नोडमध्ये कोरानाची रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्यात येणार आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. (Panvel central park Close after Social distancing rule not follow)

सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश

अवघ्या दोन दिवसांपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’ने खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याची बातमी दिली होती. या बातमीनंतर कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सेंट्रल पार्क येथे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.

सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी

पनवेल मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कळंबोली आणि नवीन पनवेल शहराचा नंबर लागतो. सेंट्रल पार्क परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक हजेरी लावत असतात. अनेक गाड्यांना पार्किंग करण्यासाठीही जागा मिळत नाही.

पनवेलमधील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळत होती. मात्र पनवेल मनपा याकडे कानाडोळा करत आहे. या सेंट्रल पार्कमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करत आहे. तसेच या ठिकाणचे पार्किंगसुद्धा हाऊसफुल पाहायला मिळत आहे.

खारघरमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढती

खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे 100 एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान आहे. या ठिकाणी रोज नवी मुंबई, कामोठे, कळंबोली येथील नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत असतात. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते. खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. (Panvel central park Close after Social distancing rule not follow)

संबंधित बातम्या : 

PHOTO : पनवेलच्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी, मनपाचा मात्र कानाडोळा

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.