AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

५ हजार कोटींचा दावा करा पण…; अब्रुनुकसानीच्या दाव्यावर नवनाथ बनांचं मोठं आव्हान, शिवराज मोरेंसमोर ठेवली एकच अट!

Navnath Ban On Shivraj More: शिवराज मोरेंच्या पत्रकार परिषदेनंतर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवराज मोरेंवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. तसेच उत्तराची मागणी केली आहे.

५ हजार कोटींचा दावा करा पण...; अब्रुनुकसानीच्या दाव्यावर नवनाथ बनांचं मोठं आव्हान, शिवराज मोरेंसमोर ठेवली एकच अट!
| Updated on: Oct 07, 2026 | 7:07 PM
Share

शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे वक्तव्य केले होते. तरुणीसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनाथ बन यांनी शिवराज मोरेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवराज मोरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी मोठा खुलासा करत नवनाथ बन यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा दावा केला होता. यानंतर आता या सगळ्यावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवराज मोरे यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर मोठं आव्हान दिलं आहे.

या प्रकरणी बोलताना नवनाथ बन म्हणाले की, मी शिवराज मोरेंची पोलखोल केली होती. मुलीवर काही बोललो नाही. मी त्या ताईबाबत कोणताच अपशब्द वापरला नाही. ड्रग्ज होते त्याचे काय केले? त्रास देणाऱ्याबाबत कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार केली? शिवराज मोरेंना फोन आला ते मदतीला गेले, पण हाणामारी का केली? त्या मुलीला छेडणाऱ्यावर तक्रार कोणत्या पोलीस स्टेशला केली? आंदोलन सोडून का तिथे गेला? अशा प्रश्नांचा भडिमार बन यांनी मोरेंवर केला आहे.

ते म्हणाले की, त्या तरुणीवर मी बोललोच नाही. पण ते विद्यार्थी आहेत का हा माझा रोहित पवारांना सवाल आहे. ड्रग्ज कोणत्या पोलीस स्टेशनला जमा केले की स्वत:जवळच ठेवले? तुम्ही कोणती परीक्षा देत आहात? रोहित पवारांच्या आंदोलनात 20 टक्के मुलं आणि 80 टक्के बाकीचे लोक आहेत. आंदोलनात बारामतीचे अॅग्रोचे लोक आहे. त्यांची अब्रू नसेल तर 0 चा दावा केला असेल. मी साधे प्रश्न विचारले होते. तुम्ही जे करताय त्याला पळपुटेपणा म्हणतात, अशा शब्दात नवनाथ बन यांनी मोरेंना सुनावले आहे. तसेच एक आव्हान दिले आहे.

नवनाथ बन पुढे म्हणाले की, माझे आव्हान आहे 5 हजार कोटींचा दावा करा. कोर्टात काय करायचे ते आम्ही पाहू. विनाकारण आंदोलन ताणायचे आणि राहुल गांधींना इथे आणायचे. त्यानंतर प्रदेशअध्यक्षपद मागायचे, असे सुरु आहे. नवनाथ बन कोणालाही घाबरत नाही. माझ्या साध्या सरळ प्रश्नांची उत्तर द्या. ड्रग्ज सापडले असेल आणि जर ते पोलीसांच्या स्वाधीन केले नसेल तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे. माझे पुणे पोलिसांना विनंती आहे या प्रकरणाचा पूर्ण तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा