महाविकास आघाडीच्या कमजोर कड्या कधीही तुटतील, मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंनी हैराण होऊ नये-नवनीत राणा

महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या कमजोर कड्या कधीही तुटतील, मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंनी हैराण होऊ नये-नवनीत राणा
नवनीत राणा
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 4:20 PM

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi Speech) यांनी आजही राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं बोलताना अनेकवेळा कौतुक केले आहे, त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावरून पुन्हा महाविकास आगाडीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. तसेच शरद पवार यांच्या कामाबाबत शंका नाही, जिथं राज्याचे मुख्यमंत्री घरात बसतात मात्र, दुसरीकडे या वयातही शरद पवार साहेब काम करतात त्यांचं मोदींनी कौतुक केलं ही कोणतीही चूक नाही, अशी कोपरखिळी त्यांनी मारली आहे.

कड्या कमजोर झाल्या, कधीही तुटतील

सकाळीच संजय राऊतांनी जे सूचक विधान केलं त्यावरी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणतात मी सगळ्यांच्या बोलण्यबाबत ठेका घेतला नाही, पण महाविकास आघाडी मधील नातं तुटत चालल आहे. सध्या महाविकास आघाडीमधील कड्या कमजोर होत आहेत. असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, त्यांच्यात समन्वय नाही अशी टीका अनेकदा भाजपकडून होत असते, मात्र नवनीत राणा यांच्या या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण आलंय. मोदींनी भाषण केलं, दिल्लीतल्या संसदेत मात्र त्यावरून महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार खडाखडी सुरू झाली आहे.

मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2013 पर्यंत देशाने दुर्दशेत दिवस काढले. 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना जुने दिवसच दिसणार नाही, अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात चढ-उतार येत असतात. त्यातून व्यक्तीगत निराशा निर्माण होते, ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर असताना देशाची चिंता करायची नाही, असं असतं का? कुणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. नाराज होत असाल तर तुमचे जे मतदार संघ आहेत तिथले लोकही उदास होतील, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली.

VIDEO | तरीही शरदराव प्रेरणा देतात, राहुल गांधींना धडा देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून पवारांवर कौतुकाचा वर्षाव

…तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं हसत हसत उत्तर

…आणि मंगेशकरांना काढून टाकलं! मोदींकडून लता दीदींचा उल्लेख, काँग्रेसला आरसा दाखवला, गोव्यावर डोळा?