AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samir Wankhede : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे राजकारणात एंट्री करणार का?

Samir Wankhede : महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारसंघातून समीर वानखेडे निवडणूक लढवणार?. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे हे नाव चर्चेत आलं होतं. ते अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत.

Samir Wankhede : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे राजकारणात एंट्री करणार का?
samir wankhede-kranti redkar
| Updated on: May 11, 2023 | 12:11 PM
Share

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे लवकरच राजकारणात प्रवेश करु शकतात. समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्स प्रकरणात चर्चेत आलेले अधिकारी आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. समीर वानखेडे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीद्वारे आपल्या राजकीय इनिंगची सुरुवात करु शकतात.

सरकारी अधिकारी असण्याबरोबरच समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे राजकारणात आले, तर कुठून निवडणूक लढवणार? हा मुद्दा आहे. समीर वानखेडे हे वाशिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. समीर वानखेडे हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणारे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय.

आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात

समीर वानखेडेच्या नेतृत्वाखाली NCB टीमने 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई बंदराजवळ एका क्रूजवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यावेळी बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात NCB ने आर्यन खानसह सहाजणांवरील ड्रग्स बाळगल्याचे आरोप हटवले होते. वानखेडेंची बदली

समीर वानखेडे यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमधून एनसीबीच्या एका टीमने तपास आपल्या हाती घेतला. वानखेडेंची बदली केली. या प्रकरणाशी संबंधित एक रिपोर्ट्ही समोर आला होता. त्यात आर्यन खानला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं, असं म्हटलं होतं. एनसीबीच्या तपासात काही त्रुटी होत्या. पुरेसे पुरावे नसताना, तपास पुढे सुरु ठेवला. पाच डझन लोकांची जबानी नोंदवण्यात आली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.