सर्वात मोठी बातमी ! अजितदादांकडून दिलगिरी, छगन भुजबळ यांना थेट फोन; नाराजी दूर होणार?
जहाँ नहीं चैंना वहाँ नहीं रहना म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त करत वेगळे होण्याचेही संकेत दिले होते. यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसत आहे. मात्र आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. छगन भुजबळ यांना कोणतेही मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले होते. जहाँ नहीं चैंना वहाँ नहीं रहना म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी वेगळे होण्याचेही संकेत दिले होते. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”, असे छगन भुजबळ म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसत आहे. यानंतर त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आता मात्र थेट अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर केली आहे.
“अजित पवारांचा फोन आला”
छगन भुजबळ यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिपदावरुन नाराजी दूर झाल्याबद्दल भाष्य केले. विशेष म्हणजे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. “मला चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला होता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की त्यांनी उशिरा फोन केला म्हणून. त्यांनी आपण बसून बोलू असं म्हटलं आहे”, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. यामुळे आता छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
“जर ते दोषी असतील तर…”
धनंजय मुंडेंचा बाबत आधीच बोललो आहे. दोषी नसतील तर कारवाई नको. आता जर ते दोषी असतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असे छगन भुजबळ म्हणाले.
“शिवभोजन थाळी सुरु ठेवावी”
“मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. नाशिकला सिंहस्थ कुंभ येत आहे. त्यामुळे नाशिकला आर्थिक निधी मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात मूल्य काढून टाकल पाहिजे त्यासंदर्भात पत्र दिलं. शिवभोजन थाळीचा लाभ हा २ हजार केंद्रात होत आहे आणि लाखो लोक हे याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे ही योजना बंद झाली नाही पाहिजे. याकरिता ही भेट मी घेतली होती आणि शिवभोजन थाळी केंद्रावर लोकांना रोजगार मिळत आहे. शिवभोजन थाळी केंद्रावरील खर्च हा कमी आहे. राज्यात अनेक हजारो कोटींचे प्रकल्प होत आहे. त्यामुळे गरीब लोकांना या केंद्रांचा फायदा होत आहे त्यामुळे ही योजना चालू ठेवली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली”, असेही छगन भुजबळांनी यावेळी सांगितले.