AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरच्या संतापजनक घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बदलापुरातील संतापजनक घटनेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित घटनेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर उसळलेल्या गर्दीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. लोकांना आता परिवर्तन हवं आहे, असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं.

बदलापूरच्या संतापजनक घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 21, 2024 | 5:48 PM
Share

बदलापुरातील संतापजनक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटात आज मराठवाड्यातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी बदलापुरात काल उसळलेल्या आंदोलनावर भूमिका मांडत जनतेला आता परिवर्तन हवं असल्याचं म्हटलं. “लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाहायला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची 4 आणि काँग्रेसची केवळ 1 लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.

‘लोकांमध्ये खूप अस्वस्थता’

“आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“एनसीपी, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या. तुमचं एनसीपीत अंत:करणापासून स्वागत, असा शब्दांत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. “अनेक वर्षे तुम्ही शैक्षणिक जीवनात काम करत आहात. सरकार आणण्यासाठी सामूहीक प्रयत्न करावे लागतील. तुमचे सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही येण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्याचा पुरेपुर उपयोग परिवर्तनासाठी केला पाहिजे”, असंदेखील आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.