Sharad Pawar : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा पवार नेमकं काय म्हणाले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा पवार नेमकं काय म्हणाले
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 7:26 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (death threat) आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली. तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुक पेजवरून देण्यात आली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले असून या धमकीनंतर शरद पवार यांची पहिल्यांदाचा प्रतिक्रिया आली आहे. ‘ मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले.

कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्या धमकीची चिंता नाही, आपला राज्यातील पोलीसांवर विश्वास आहे असे शरद पवार यांनी नमूद केले.

शरद पवार यांना समाजमाध्यमावर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू अशी धमकी आली आहे. त्यावर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी सरकारवर आहे. पोलिस दलावर पूर्ण विश्वास आहे आणि धमकीची चिंता मी करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे हे प्रकरण ?

शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी मिळाली होती. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. पोलीस आयुक्तांना भेटून त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेलं आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.