AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Sharad Pawar | शरद पवार यांचा आजचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या

NCP Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला आहे. पुढचे काही दिवस त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेले दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रीय झाले आहेत. आजपासून त्यांचा दौरा सुरु होईल.

NCP Sharad Pawar | शरद पवार यांचा आजचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या
NCP Chief Sharad PawarImage Credit source: PTI
| Updated on: Jul 03, 2023 | 7:51 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला. रविवार सुट्टीचा दिवस असूनही राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. दुपारी अचानक अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार असल्याचा बातमी आली. राजकीय जाणकारांसह सर्वसामान्यांना या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवारांनी पक्षात बंड केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.

रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात दुपारनंतर मोठी हालचाल दिसून आली. तिथल्या कार्यक्रमाचे, उपस्थित नेत्यांचे जे फोटो समोर आले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

किती आमदारांचा पाठिंबा ?

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बंडात अजित पवारांसोबत आहेत. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय, विश्वासू मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे आतापर्यंतच सर्वात मोठ बंड आहे. अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते स्पष्ट झालेलं नाहीय. काल राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपण अजूनही शरद पवार यांच्यासोबतच असल्याच सांगितलं.

राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याच बोलल जातय. अजित पवारांनी काल शपथविधीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्याविषयी काहीही वक्तव्य केलं नाही. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, असं सांगितलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. शरद पवार यांचा आजचा कार्यक्रम कसा असेल?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पुन्हा नव्या ताकदीने उभे राहू असं सांगितलय. राजकीय जीवनात हे पहिल्यांदा असं घडलेलं नाहीय, असंही शरद पवार म्हणाले. शरद पवार आता पुण्यामध्ये आहेत. आज सकाळी 8 वाजता शरद पवार कराडच्या दिशेने रवाना होणार आहे. 11 वाजता ते यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. 11.15 वाजता ते कराडहून साताराला रवाना होतील. त्यानंतर 3.30 वाजता साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.