AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादावर अखेर सुनेत्रा पवार यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत वादावर अखेर सुनेत्रा पवार यांनी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. सुनील तटकरे यांनी तर चक्क शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादावर अखेर सुनेत्रा पवार यांनी घेतला महत्वाचा निर्णय
Sunetra Pawar
| Updated on: May 18, 2026 | 12:07 PM
Share

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात विसंवाद निर्माण झाला आहे. काही नेते नाराज झाले आहेत. यामागे कारणही तशीच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नव्हता. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नव्हता. पण अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा होती. प्रफुल पटेल यांना सुद्धा डावललं जात असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे यांनी तर थेट सिलव्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांना भेटलो असं सुनील तटकरेंकडून सांगण्यात आलं. त्यानंतर शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत क्षमता असणारे नेते म्हणून कौतुक केलं. त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हा त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला हा विसंवाद आणि मतभेदांची दरी वाढल्यानंतर आता सुनेत्रा पवार सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलवली जाणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

आमदारांमध्ये दबक्या आवाजात काय चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरुन पक्षात नाराजी असल्याची माहिती आहे. आमदारांचा एक गट सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं समर्थन करतो. दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं समर्थन करतो. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचं समर्थन असल्यामुळेच पक्षात हे सर्व सुरु असल्याची आमदारांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांना डॅमेज कंट्रोल करण्यात कितपत यश येतं ते लवकर समजेलं. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका बड्याने नेत्याने पार्थ पवार यांना समज द्यावी म्हणून शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?