मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बाहुबली नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; आता लवकरच…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील बाहुबली नेत्याने राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऐन निवडणुकांच्या काळात या नेत्याचा राजिनामा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.

ऐन नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा हा निर्णय सांगितला आहे. आता ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत सलील देशमुख म्हणाले की, सहा महिन्यांपासून तुमच्यापैकी काहींना माहिती असेलच माझी प्रकृती थोडी अस्वस्थ असल्यामुळे, थोडी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा राजिनामा देतो.
नेमकं काय आहे कारण?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सलील देशमुख यांनी टीव्ही ९शी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या राजिनाम्याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून माझी प्रकृती खूप काही चांगली नसल्यामुळे काही महिने प्रकृती आणखी चांगली करुया. आणि मग जोमाने लोकसेवेत लागूया. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे. ही वस्तूतीस्थिती आहे. दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार का? असा प्रश्न विचारताच सलील देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष असेल, शरद पवारांनी माझ्या कुटुंबाला खूप काही दिले आहे. खूप मानसन्मान आपल्याला पक्षात भेटला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला लोकसभा आपल्याला करायची आहे, मोठे प्रकल्प, मोठी विकास कामं आपल्या जनतेसाठी आणली आहेत. लोकसेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांमध्ये जनसंपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांमध्ये जायचे आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, राजीनाम्यानंतर सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मला खूप काही दिलं असल्याचं बोलून दाखवलं आहे. म्हणजेच त्यांनी माझी कोणावरही नाराजी नसल्याचेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळेच सलील देशमुख यांच्या मनात काय चालले आहे, ते भविष्यात नेमका काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
