मोठी बातमी! राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी, बड्या नेत्याने थेट कबुलीच दिली, मोठं विधान
मोठी बातमी समोर येत आहे, आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे.

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचं पहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या दोन जागा अधिकृतपणे भाजपच्या वाट्याला आल्या असताना या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर यवतमाळची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असताना देखील या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान पुण्यामध्ये देखील असंच चित्र पहायला मिळत आहे. पुणे विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेली आहे. पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे. आज थोडे लोक नाराज झाले आहेत, पण त्यांना भविष्यात संधी देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. काही जण नाराज झाले आहेत, पण मी आधीच सांगितलं आहे पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. नक्कीच मी युवक म्हणू ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेन, निवडणूक बिनविरोध झाली तर बर होईल, असं यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे कोणीही नाराज होऊ नये, एकजुटीनं रहावं असं आवाहन पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.