कोरोना युद्धात परिचारिकाच सैनिक, तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत; जयंत पाटलांचे नर्सना भावनिक पत्र

या काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरुर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत आहे, असं पत्र मंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना लिहिलं आहे. (Jayant Patil Emotional Letter to Nurses on International Nurses Day)

कोरोना युद्धात परिचारिकाच सैनिक, तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत; जयंत पाटलांचे नर्सना भावनिक पत्र
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 3:59 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने जगभरातील नर्सेसविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. फक्त ‘कोरोना’सारख्या संकट काळातच नाही, तर कायमच निरपेक्ष वृत्तीने रुग्णसेवा-सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांचे ऋण यानिमित्ताने व्यक्त केले जात आहेत. कोरोना युद्धात लढणारे सैनिक तुम्ही साऱ्या परिचारिका आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार, असं भावनिक पत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना लिहिलं आहे. (Jayant Patil Emotional Letter to Nurses on International Nurses Day)

काय आहे पत्र?

सर्व परिचारिका भगिनींना, सविनय नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा! जगात प्रत्येक व्यक्ती अर्थप्राप्तीसाठी काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील. परिचारिका म्हणुन नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे.

आज सारे जग Covid 19 सारख्या अत्यंत गंभीर युद्धात लढत असताना, या युद्धात सैनिक मात्र तुम्ही सार्‍या परिचारिका आहात. या लढाईचे नेतृत्व देखील तुमच्याकडेच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत आहात, याची आम्हा सर्वांना पूर्ण जाणीव आहे.

तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग Covid19 च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल. या सार्‍या काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरुर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत आहे.

तुमचा भाऊ, (जयंत)

(Jayant Patil Emotional Letter to Nurses on International Nurses Day)

हेही वाचा : International Nurses Day | नेते-अभिनेते ते क्रिकेटपटू, परिचारिका दिनी दिग्गजांकडून नर्सना सलाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :

जगभर विषाणूचा कहर सुरु असतानाही तुम्ही अनेक रुपात उभ्या आहात. तुमच्या निरपेक्ष आणि सेवाभावामुळेच अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांत परतत आहेत. तमाम परिचारिका माता भगिनींना त्यांच्या त्याग, समर्पण व सेवा व्रतासाठी मानाचा मुजरा. शतश: नमन!

उपमुख्यमंत्री अजित पवार :

‘आंतरराष्ट्रीय नर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आमच्या परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील.

आरोग्यमंत्री राजेश टोपे :

आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या रुग्णांच्या अविरत कष्ट घेणाऱ्या परिचारिका भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. कोरोना विरुद्धच्या लढाईत या भगिनी सेवा देण्याचे मोठे कार्य करत आहेत.त्यांच्या कार्याला व जिद्दीला सलाम..!

(Jayant Patil Emotional Letter to Nurses on International Nurses Day)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.