AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Andolan : नवी मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन तापलं; रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने नवी मुंबईत जोरदार आंदोलन केले. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भांडी वाजवून आणि चुलीवर भाकरी थापून जनक्षोभ व्यक्त केला. सामान्य नागरिक व मध्यमवर्गीयांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे.

NCP Andolan : नवी मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन तापलं; रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचं नवी मुंबईत आंदोलन, रोहित पवार, सुप्रिया सुळे सहभागी
| Updated on: Jun 03, 2026 | 11:26 AM
Share

देशात सातत्याने वाढणारी महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. याच मुद्यांवरून आता राज्यातील वातावरणही तापलं आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून याच मुद्यांवरून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आधी शांततेने सुरू असलेलं हे आंदोलन पाहता पाहता तापलं आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक रूप धारण केलं.

आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांनी आक्रमक स्वरूनप घेताच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.  सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकांसह रोहित पवार, आव्हाड, शशिकांत शिंदे यांनाही ताब्यात घेतलं. तसेच  सक्षणा सलगर, रोहिणी खडसे यांनाही उचलून पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं.   पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून वाढत्या महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

नवी मुंबईत आंदोलन 

जनविरोधी धोरणांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. भांडी वाजवत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. या सरकारचं करायचं काय, काली डोक वर पाय, अशा अनेक घोषणा देत आणि महागाईविरोधात नाराजी व्यक्त करत नाराजीही व्यक्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर कार्यकर्त्यांनी भररस्त्यात खाली बसून, रस्त्यावरच चूल पेटवून भाकरीही थापली. रोहित पवार हेही यावेळी कार्यकर्त्यांसोबत बसलेले दिसून आले.

सरकारला जाग येणार का  ?

महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, लोकांचं जीवन अवघड होत चाललं आहे. पेट्रोलचे, डिझेलचे भाव वाढलेत. घरगुती गॅस महागला, कमर्शिअल गॅसचेही दर वाढलेत ना.यामुळे सामान्य व्यक्ती, मिडल क्लास चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यांच्यावतीने, त्यांचा आवाज बनून, सरकारपर्यंत त्यांचा आवाज जावा, झोपलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी या हेतूने आम्ही हे आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. कोणालातरी लोकांच्या बाजून लढावं लागेल ना. सरकार ऐके, न ऐकेल, काय होईल माहीत नाही, पण लढणं ही आमची भूमिका आहे. लोकांसाठी बोलणं ही आमची भूमिका आहे. लोकांच्या वतीने आम्ही बोलत आहोत, लढत आहोत, असंही रोहित पवार म्हणाले.

देशाची आर्थिक परिस्थिती खालावली- सुप्रिया सुळे

राज्याची नव्हे तर देशाची आर्थिक परिस्थिती ही प्रचंड अडचणीत आहे. याबद्दल आम्ही सगळे वारंवार बोललो आहोत. माझी भारत सरकारला विनंती आहे की मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हा आमचा विषय नाही, राजकारणाचा विषय नाहीये, महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा हा विषय आहे.  इमानदार, सामान्य माणूस यात भरडला जातोय, हे होणार आहे, आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून पार्लमेंटमध्ये वारंवार बोलूनही दाखवलंय, त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

बातमी अपडेट होत आहे.

Follow Us
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय पहापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय पहापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा.
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात.
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.