
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी म्हणजेच 2 डिसेंबरला पार पडले. मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र आता सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीने केला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन सुरू केले आहे. यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ परायला मिळाला आहे.
आष्टा नगरपरिषदेच्या मतदानाच्या ईव्हीएम मशीन विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये स्ट्राँग रूम तयार करूण ठेवण्यात आल्या आहेत. काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर झालेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ झाली असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
मतदानात रातोरात वाढ झाल्याचा आरोप करत आष्टा येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूम समोर आदोलन सुरु केले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी गोधळ घातला. तसेच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही असा आरोप यावेळी कार्यकर्यांनी केला. यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आष्ट्यातील नागरिकही उपस्थित होते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितले की आष्टा नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानाची माहिती काल सायंकाळी देण्यात आली होती. काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार, एकूण मतदारांची संख्या 30,328 इतकी आहे. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 1311 एकूण मतदार आहेत. मात्र येथे एकूण मतदारांची संख्या 4077 दाखवण्यात आली आहे, तसेच यातील 3109 मतदारांनी मतदान केले असल्याचे समोर आले आहे. तसेच इतर वॉर्डमधील मतदानातही फरक असल्याते समोर आले आहे.
दरम्यान, या निवडणुकीचा आज जाहीर होणार होता, मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्याआधी 20 डिसेंबरला काही ठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर एकूण सर्व निवडणुककांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे.