AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनावश्यक हस्तक्षेप केला तर…थेट कटू निर्णय… सुनेत्रा पवार यांनी भर सभेत भरला दम, रोख कुणाकडे?

संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागा. गाव वाडी वस्ती प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची फळी उभी केली पाहिजे. पक्षात ज्येष्ठता सन्मान राहील. नव्या पिढीला संधी दिली जाईल. आपण ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधणार आहोत, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अनावश्यक हस्तक्षेप केला तर...थेट कटू निर्णय... सुनेत्रा पवार यांनी भर सभेत भरला दम, रोख कुणाकडे?
sunetra pawar speechImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 5:47 PM
Share

Sunetra Pawar Speech : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्य 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रमुख तथा उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री, आमदार, खासदार तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या पक्षाची दिशा कशी असेल, आगामी राजकारण कसे असेल याची झलक आपल्या भाषणातून दिली. त्यांनी आपला पक्ष दिवंगत नेते अजित पवार यांच्याच विचारांनी चालेल. तसेच पक्षात अनावश्यक हस्तपेक्ष झाल्यास मला कटू निर्णय घ्यावा लागेल, असा थेट दमच भरला. मी पक्षाची बदनामी खपवून घेणार नाही, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांचा रोक कुणाकडे होता, अशी आता राजकारणात चर्चा रंगली आहे.

मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन…

संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागा. गाव वाडी वस्ती प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची फळी उभी केली पाहिजे. पक्षात ज्येष्ठता सन्मान राहील. नव्या पिढीला संधी दिली जाईल. आपण ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधणार आहोत. महिलांचा आदर केला जाईल. आपल्याला माहीत आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या चार महिन्यात मी ही जबाबदारी वेगळ्या परिस्थितीत घेतली. ही जबाबदारी घेत असताना मला नक्कीच येणाऱ्या सर्व गोष्टींची जाणीव होती. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा मला माहीत आहे. योग्यवेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

दादा ज्या प्रमाणे पक्ष हितासाठी कटू निर्णय घेत होते…

तसेच, प्रत्येकवेळी मी सर्वांना समजून घेतलं. सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सर्वांना खूप समजून घेतलं. सर्वांचे हट्ट पुरवले. प्रेम केलं. मान सन्मान दिला. पदं दिली. जे जे म्हणाल ते त्यांनी त्यांच्या परीने दिलं. या पुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. पण कुणाचा अनावश्यक हस्तक्षेप असेल तर विचार केला जाईल. दादा ज्या प्रमाणे पक्ष हितासाठी कटू निर्णय घेत होते. त्याचप्रमाणे असे निर्णय घेण्यास मला जड जाईल, पण न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर जाण्याचा निर्णय घेईल, असा सज्जड दमही सुनेत्रा पवार यांनी भरला.

कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी

कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष हिताच्या निर्णयात माझ्यासोबत असतील आणि साथ देतील. सरकारमधील प्रत्येक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागरूकपणे काम केलं पाहिजे. पक्षाची होणारी बदनामी माझ्यासह सर्वांची जबाबदारी आहे. मला यात कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.

गुणवत्ता आणि पात्रता असणाऱ्यांनाच संधी दिली जाईल

विविध महामंडळे आणि सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. पक्ष निष्ठा आणि पक्षासाठी समर्पण याचा विचार केला जाईल. ज्यांनी महामंडळासाठी अर्ज केला असेल त्याचा विचार केला जाईल. काळजी करू नका. गुणवत्ता आणि पात्रता असणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. किती वर्ष काम केलं, या पेक्षा पक्षाला किती पुढे नेले याचा विचार केला जाईल. कधी कधी पक्ष विस्तारासाठी बाहेरच्या नेत्यांना पक्षात घेतल्यावर त्यांचा सन्मान करण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. पण तसं करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Follow Us
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने